जीटीबी नगर पुनर्विकासात ६३५ चौ.फुटांची सदनिका

Total Views |
GTB Nagar Redevelopment
 
मुंबई : (GTB Nagar Redevelopment) शीव कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या गुरु तेग बहादुर नगर समूह पुनर्विकास प्रकल्पाला अखेर निर्णायक गती मिळाली आहे. सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांनी म्हाडा व नियुक्त कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी यांच्यासोबत त्रिपक्षीय विकास करार केला असून, म्हाडा व सी ऍण्ड डीए दरम्यान बांधकाम-विकास करार देखील संपन्न झाला आहे.
 
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात हा करार म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर तसेच किस्टोन रिअलटर्स (रुस्तुमजी ग्रुप) चे व्यवस्थापकीय संचालक बोमन इराणी उपस्थित होते. विशेष म्हणजे, खाजगी जमिनीवरील इमारतींचा सी&डीए मॉडेलअंतर्गत राबविण्यात येणारा हा म्हाडाचा पहिलाच पुनर्विकास प्रकल्प आहे.
 
शासन मान्यतेनंतर करार प्रक्रिया पूर्ण झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस आता वेग मिळणार आहे. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर पात्र रहिवाशांना दरमहा २०,००० भाडे अनुदान देण्यात येणार आहे. तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी इमारतींची देखभाल व व्यवस्थापनाची जबाबदारी म्हाडा पार पाडणार आहे.
 
हेही वाचा : महिला दिनी ऍक्वा लाईनची धुरा महिलांच्या हाती; २ स्थानके पूर्णपणे महिला संचलित करणार
 
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
 
सुमारे ११.२० एकर जागेवर पुनर्विकास
 
१२०० लाभार्थ्यांसाठी तीन आधुनिक निवासी टॉवर्स
 
३९ ते ४८ मजली इमारतींचे नियोजन
 
विनियम ३३(९) अन्वये फंजिबलसह किमान ४.५ चटई क्षेत्रफळ
 
प्रत्येक पात्र लाभार्थ्यास ६३५ चौ. फु. आधुनिक सदनिका विनामूल्य
 
गेटेड कम्युनिटी संकल्पना व बहुमजली बेसमेंट-पोडियम पार्किंग
 
 हे वाचलत का? - Vishwas Patil : 'संभाजी' कादंबरीतील 'तो' उल्लेख काल्पनिक! विश्वास पाटील नेमकं काय म्हणाले?
 
जीवनशैली सुविधा
 
सुसज्ज व्यायामशाळा
 
इनडोअर गेम्स झोन
 
योगा/मल्टी-फंक्शन स्टुडिओ
 
मुलांसाठी खेळण्याची जागा
 
वाचनालय
 
सुमारे ४,००० चौ. फु. प्रशस्त बँक्वेट हॉल
 
‘ई-डेक’ स्तरावर हिरवेगार लँडस्केप व खुले प्रांगण
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.