Ashish Shelar : आरबोरिकल्चरच्या माध्यमातून 'वृक्ष-साहित्य' आणि 'उत्सव' साजरा करू - मंत्री आशिष शेलार

    07-Mar-2026   
Total Views |

  
Ashish Shelar

 

मुंबई : (Ashish Shelar) अत्याधुनिक आरबोरिकल्चरच्या माध्यमातून 'वृक्षांचे क्लिनिक' उभारून महानगरपालिका क्षेत्रात निधी आणि धोरणात समावेश करून 'वृक्षांचे साहित्य' आणि 'उत्सव' साजरा करू, अशी ग्वाही मुंबई शहराचे पालकमंत्री तथा माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली.

ग्रोइंग सिटीज, ग्रीनर कॅनोपीज' या संकल्पनेवर आधारित दुसरी आंतरराष्ट्रीय अरबोरिकल्चर परिषद वृक्षवर्धन २०२६ मुंबईतील हॉटेल सहारा येथे सुरू झाली. अमेनिटी ट्री केअर असोसिएशन (एटीसीए) आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या परिषदेत ते बोलत होते. यावेळी एटीसीए संघटनेचे संचालक वैभव राजे, संचालक नकुल सावनी, नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे आर्यन पांडे आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे उपस्थित होते.

मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, "मुंबई, दिल्लीसह जगभरातील अनेक शहरांमध्ये प्रदूषणाची समस्या भासत आहे. सर्वत्र निसर्ग आणि माणूस यामधील द्वंद्व सुरू आहे. आंतरराष्ट्रीय अर्बोरिकल्चर परिषदेच्या निमित्ताने या सर्व समस्यांवर पर्यावरणीय दृष्टिकोनातून उपाय काढण्याचे पाहून मला समाधान वाटत आहे. पारंपरिक वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्च करूनही अपेक्षित परिणाम मिळाले नाही हे वास्तव आहे," असे ते म्हणाले.(Ashish Shelar)

हेही वाचा : Sunetra Pawar : राज्यसभा हे उच्च सभागृह, पार्थ नक्कीच चांगली कामगिरी करेल - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

"आपला देश, राज्य आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये वृक्षाचा समावेश आहे. माणसांप्रमाणे झाडावर देखील उपचार होऊ शकतात, म्हणून झाडांचे क्लिनिक मला या परिषदेमध्ये पाहायला मिळाले. भविष्यातील पर्यावरण संरक्षणासाठी कल्चरचा धोरणात समावेश करून त्यासाठी आवश्यक तो खर्च देखील केला जाईल. शास्त्रीय पद्धतीने वृक्षांचे संवर्धन आणि 'एक पेड मा के नाम' हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश घराघरात आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे," असेही त्यांनी (Ashish Shelar) सांगितले.

दि. ८ मार्च रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या परिषदेस उपस्थित राहणार आहेत. यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण सदिच्छा दूत आणि प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा मुख्य वक्त्या असतील. जागतिक तज्ञांच्या सत्रांसह शहरी वृक्षसंवर्धन, अरबोरिकल्चर पद्धती आणि हवामान बदल या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.(Ashish Shelar)

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....