Chandrashekhar Bawankule : नागपूर-अमरावतीची वाहतूक व्यवस्था होणार हायटेक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रवाशांच्या सोयीसाठी पुढाकार

    06-Mar-2026
Total Views |
Chandrashekhar Bawankule
 
मुंबई : (Chandrashekhar Bawankule) नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रवासीभिमुख करण्याच्या सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिल्या. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची आढावा बैठक विधानभवनातील महसूलमंत्र्यांच्या दालनात पार पडली. बैठकीत बसस्थानकांचे आधुनिकीकरण, नवीन बसेसची उपलब्धता आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबत निर्णय घेण्यात आले. उन्हाळ्याच्या दिवसात प्रवाशांची गैरसोय होऊ नये. तसेच परीक्षांच्या दिवसात विद्यार्थ्यांना बस थांब्यांवर बस थांबविली जावी. वाहन थांब्यांसाठी आवश्यक असल्यास डीपीडीसीमधून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महसूलमंत्र्यांनी (Chandrashekhar Bawankule) यावेळी दिले.
 
गणेशपेठ बसस्थानकाचा कायापालट होणार
 
महसूलमंत्री बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकातील दुरवस्थेवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी तातडीने २०० नवीन स्टीलच्या खुर्च्या, ५ वॉटर कुलर आणि प्रवाशांच्या निवासासाठी ५० बेडची अद्यावत डॉर्मिटरी बांधण्याच्या सूचना दिल्या. तसेच, येथील 'हिरकणी कक्ष' केवळ नावाला न ठेवता तो पूर्ण सोयींनिशी सज्ज असावा, असे निर्देशही दिले.(Chandrashekhar Bawankule)
 
नागपूर जिल्ह्यासाठी १६० नवीन बसेस; चालक भरतीचा मार्ग मोकळा
 
जिल्ह्यात सध्या १६० नवीन बसेसची आवश्यकता असून, त्यापैकी १०० बसेस (काटोल, गणेशपेठ, सावनेर, इमामवाडा, वर्धमाननगर) आधीच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रिक्त असलेल्या १५४ चालक-वाहकांच्या जागा दोन महिन्यांत भरण्याचे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
 
हेही वाचा : Maharashtra Budget 2026: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात जनतेसाठी काय?  
 
पायाभूत सुविधा आणि 'पीपीपी' मॉडेल
 
काम पूर्ण : काटोल बसस्थानकाचे नूतनीकरण आणि कोंढाळी येथील काम पूर्ण झाले आहे.
 
प्रगतीपथावर : हिंगणा, रामटेक आणि उमरेड येथील बसस्थानकांचे काम सुरू आहे.
 
पीपीपी मॉडेल : बुटीबोरी, कुही, जलालखेडा आणि खापा येथील बसस्थानके सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) विकसित केली जाणार आहेत.
 
प्राधान्य : कामठी आणि महुदा येथील कामांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य देऊन महुदा येथे मोठे बसस्थानक उभारण्यासाठी
सरकारी जागेची मागणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
 
महिला बचत गटांना रोजगाराची संधी
 
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने, बसस्थानकांवरील दुकानगाळे चालवण्यासाठी महिला बचत गटांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंगणा, काटोल आणि रामटेक येथील 'उमेद' अभियानांतर्गत बचत गटांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार केला जाणार आहे.(Chandrashekhar Bawankule)
 
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कडक सूचना
 
ग्रामीण भागात बसेस थांबवल्या जात नसल्याच्या तक्रारींची दखल घेत, परिवहन मंत्र्यांनी सर्व नियोजित स्टॉपवर बसेस थांबवणे अनिवार्य केले आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यास तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
नागपूर मेट्रोपोलिटन परिवहन कंपनीची स्थापना
 
नागपूरमधील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी 'नागपूर मेट्रोपोलिटन परिवहन कंपनी' स्थापन करण्याचा विचार असून, त्याचा आराखडा एप्रिल अखेरपर्यंत सादर केला जाईल. अमरावती डेपोचे कामही मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.(Chandrashekhar Bawankule)