मुंबई : (Jishnu Dev Verma) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तेलंगणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा (Jishnu Dev Verma) यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती जाहीर केली आहे. तसेच देशभरातील अनेक राज्यांतील राज्यपालांमध्येही फेरबदल करण्यात आला आहे.(Jishnu Dev Verma)
उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे अतिरिक्त राज्यपाल म्हणून काम पाहत होते. त्यानंतर आता महाराष्ट्राला जिष्णु देव वर्मा यांच्या रूपाने नवे राज्यपाल मिळाले आहेत.(Jishnu Dev Verma)
कोण आहेत जिष्णु देव वर्मा?
जिष्णु देव वर्मा (Jishnu Dev Verma) यांचा जन्म १५ ऑगस्ट १९५७ रोजी झाला असून ते भारतीय जनता पक्षाचे दीर्घकाळ कार्यकर्ते आहेत. १९९० च्या दशकात राम जन्मभूमी आंदोलनामध्येही ते सहभागी झाले होते. कलकत्ता विद्यापीठातून बी.ए. ऑनर्स पदवी प्राप्त केली असून, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रमुखही राहिले आहेत. २०१८ मध्ये त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत त्यांनी चारिलम मतदारसंघातून २५ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २०१८ ते २०२३ या काळात त्यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकास अशी महत्त्वाची खाती सांभाळली. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर २०२४ मध्ये त्यांची तेलंगणाच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती.(Jishnu Dev Verma)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....