Maharashtra Budget 2026 : विकासाबाबत सरकारची ठाम बांधिलकी अधोरेखित

Total Views |
Maharashtra Budget 2026
 
मुंबई : (Maharashtra Budget 2026) महाराष्ट्र राज्याचा २०२६–२७ चा अर्थसंकल्प हा पायाभूत सुविधांवर आधारित विकासाबाबत सरकारची ठाम बांधिलकी अधोरेखित करणारा आहे. विशेषतः मुंबई महानगर प्रदेशातील रिअल इस्टेट क्षेत्रासाठी हा विकास महत्त्वाचा चालना देणारा ठरणार आहे.(Maharashtra Budget 2026) सुधारित मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, रोजगार केंद्रांपर्यंत पोहोच सुलभ होईल आणि मेट्रो मार्गांलगत नव्या निवासी व व्यावसायिक विकासाला चालना मिळेल. यामुळे गृहनिर्माणाची मागणी वाढेल आणि नव्या उदयोन्मुख मायक्रो-मार्केट्समध्ये नियोजित विकासाला प्रोत्साहन मिळेल.(Maharashtra Budget 2026)महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ७.९% दराने वाढण्याचा अंदाज असताना, पायाभूत सुविधांवरील सातत्यपूर्ण भर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास अधिक बळकट करेल आणि एमएमआरला भारतातील सर्वात गतिमान रिअल इस्टेट बाजारपेठांपैकी एक म्हणून अधिक दृढ स्थान मिळवून देईल.(Maharashtra Budget 2026)
 
- सुखराज नाहर, अध्यक्ष, क्रेडाई-एमसीएचआय
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.