Mandana Karimi : इराणच्या वास्तवाचा पर्दाफाश! अभिनेत्री मंदाना करीमींकडून धक्कादायक खुलासा

    05-Mar-2026   
Total Views |
Mandana Karimi
 
मुंबई : (Mandana Karimi) मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या तीव्र तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि अयातुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमधील अंतर्गत वास्तव आता जगासमोर येऊ लागलेत. प्रसिद्ध इराणी अभिनेत्री मंदाना करीमी (Mandana Karimi) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इराणी शासन आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या ‘लेफ्ट विंग’ मीडियावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी सांगितले की इराणमधील शाळांमध्ये मुलांना कोणतेही कारण नसताना इस्रायल आणि अमेरिकेविषयी द्वेष करायला शिकवले जाते.
 
मंदाना (Mandana Karimi) यांनी स्वतःचा अनुभव सांगताना सांगितले की त्या इराणमधील इस्लामिक रिपब्लिकच्या शाळेत शिकल्या, जिथे दररोज सकाळी इस्रायल आणि अमेरिकेविरोधात घोषणाबाजी करण्यात भाग पाडले जात असे. इराणचे शासन स्वतःच्या नागरिकांचेच मारेकरी आहे आणि जगाची दिशाभूल करण्यासाठी इस्रायलचे नाव पुढे करते. मंदाना (Mandana Karimi) यांनी दावा केला की इराणबाहेर राहणारेच नव्हे तर इराणमधील अनेक लोकही अयातुल्ला खामेनेई आणि इतर लष्करी नेत्यांच्या मृत्यूवर आनंद व्यक्त करतायत. इराणी जनता आता बदलाची मागणी करत असून ही मागणी मागील अनेक महिन्यांपासून रस्त्यांवर उमटत आहे.
 
हेही वाचा : C Ramchandra: मुंबईत रंगणार सुरांची जादू! सी. रामचंद्र यांच्या गाण्यांची खास मैफल... 
 
मंदाना (Mandana Karimi) यांनी भारतात इराणी शासनाच्या समर्थनार्थ निघणाऱ्या मोर्चांवरही आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी सांगितले की एका लोकशाही देशात लोक अशा शासनाला पाठिंबा देतात, जे महिलांचे मूलभूत हक्क पायदळी तुडवते, हे पाहून त्यांना दुःख होते. त्यांनी आरोप केला की परदेशी मीडिया आणि ‘डाव्या’ विचारसरणीचे लोक खऱ्या मुद्द्यापासून लक्ष हटवण्यासाठी इस्रायल-हमास युद्धाचा आधार घेत आहेत.(Mandana Karimi)
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक