Rajya Sabha Elections : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार

    05-Mar-2026   
Total Views |
Rajya Sabha Elections
 
मुंबई : (Rajya Sabha Elections) राज्यसभा निवडणूकीच्या सात जागांसाठी सातच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक (Rajya Sabha Elections)बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
गुरुवारी, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Elections) भाजपकडून चार, राष्ट्रवादीकडून एक आणि शिवसेनेकडून एक असे महायुतीचे सहा अर्ज दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून शरद पवारांचा अर्ज दाखल झाला आहे. भाजपचे उमेदवार विनोद तावडे, रामदास आठवले, माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानभवन येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या ज्योती वाघमारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.(Rajya Sabha Elections)
 
हेही वाचा : वैदिक तुकोबांना विद्रोही तुकाराम करण्याचे षडयंत्र का केले जात आहे ? 
 
या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Elections) शरद पवार, पार्थ पवार आणि ज्योती वाघमारे यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केलेत. जेणेकरून, चुकून एखादा अर्ज जरी बाद झाला तरी, दुसरा अर्ज कायम राहणार आहे. दरम्यान, तब्येतीच्या कारणामुळे शरद पवार अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन सगळी प्रक्रिया पूर्ण केल्याचे समजते. दरम्यान, अर्जांची छाननी झाल्यानंतर राज्यसभेसाठी या सातही नावांची औपचारीक घोषणा होण्याची शक्यता आहे.(Rajya Sabha Elections)
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....