मुंबई : (Nitish Kumar) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक्स (X) वर पोस्ट करत आगामी राज्यसभा निवडणुकीत राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी बिहारमधील नव्या सरकारला पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले आहे. नितीश कुमार आज म्हणजेच ५ मार्च रोजी राज्यसभेसाठी आपले नामांकन (उमेदवारी अर्ज) दाखल करू शकतात. (Nitish Kumar)
पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
नितीश कुमार यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, "संसदीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच, माझ्या मनात एक इच्छा होती की मी बिहार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसोबत संसदेच्याही दोन्ही सभागृहांचाही सदस्य व्हावे. त्यामुळेच यंदा होत असलेल्या निवडणुकीत मला राज्यसभेचा सदस्य होण्याची इच्छा आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे खात्री देतो की, तुमच्याशी असलेले हे नाते भविष्यातही कायम राहील आणि विकसित बिहारसाठी एकत्र काम करण्याची माझी वचनबद्धता अटळ राहील. तसेच स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला माझे पूर्ण समर्थन आणि मार्गदर्शन असेल. (Nitish Kumar)
पिछले दो दशक से भी अधिक समय से आपने अपना विश्वास एवं समर्थन मेरे साथ लगातार बनाए रखा है, तथा उसी के बल पर हमने बिहार की और आप सब लोगों की पूरी निष्ठा से सेवा की है। आपके विश्वास और समर्थन की ही ताकत थी कि बिहार आज विकास और सम्मान का नया आयाम प्रस्तुत कर रहा है। इसके लिए पूर्व में…
नितीश कुमार राज्यसभेठी आजच नामांकन अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्य़ामुळे लवकरच बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार हे निश्चित मानले जात आहे. आत्तापर्यंत नितीश कुमार हे १० वेळा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नविन यांच्यासह जाऊन नितीश कुमार राज्यसभेसाठी त्यांचा अर्ज दाखल करणार आहेत. त्यांची ही पोस्ट बिहारमधील राजकीय वर्तुळात मोठ्या बदलांचे संकेत मानले जात आहे. (Nitish Kumar)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\