मुंबई : (Sweety Ngangbam) मणिपूरसाठी अभिमानाची बाब ठरली आहे की राज्यातील २६ वर्षीय फुटबॉलपटू स्वीटी देवी नांगबाम (Sweety Ngangbam) हिला आगामी एएफसी महिला आशियाई कप ऑस्ट्रेलिया २०२६ साठी भारतीय संघाची कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. भारताची मोहीम दि. ७ मार्च रोजी पर्थ रेक्टँग्युलर स्टेडियम येथे व्हिएतनामविरुद्धच्या पहिल्या सामन्याने सुरू होणार आहे.(Sweety Ngangbam)
स्वीटी नांगबाम (Sweety Ngangbam) ही बचावपटू (डिफेंडर) असून तिने २०१४ मध्ये अंडर-१६ संघातून ‘टीम ब्लू’साठी पदार्पण केले होते. २०१६ मध्ये तिने एएफसी अंडर-१९ पात्रता फेरीत खेळ केला. २०१७ मध्ये दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यात तिने वरिष्ठ भारतीय संघात प्रवेश केला आणि तत्कालीन कर्णधार आशालता देवीसोबत बचावफळीमध्ये लवकरच आपले स्थान मजबूत केले.
नांगबाम (Sweety Ngangbam) हे तिच्या मूळ राज्यात अतिशय लोकप्रिय नाव आहे. तिच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ६९ सामने (कॅप्स) नोंदले गेले आहेत. देशांतर्गत लीगमध्ये ती सध्या भारतीय फुटबॉल लीग प्रणालीतील सर्वोच्च स्पर्धा असलेल्या इंडियन सुपर लीगमध्ये ईस्ट बंगाल एफसीकडून खेळते. कर्णधारासह एकूण २६ सदस्यीय संघाची निवड अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केली आहे. स्वीटी देवी नांगबाम यांनी हा सामना पाहण्याचे आवाहन समस्त भारतीयांना केले आहे.(Sweety Ngangbam)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक