लंडनमध्ये धर्मांध मुस्लिमांचा हिंदू कुटुंबीयांवर हल्ला! होलिका दहन कार्यक्रमास गालबोट लावण्याचा प्रयत्न

    05-Mar-2026   
Total Views |



मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
लंडनमधील हॅरो येथे इंटरनॅशनल सिद्धाश्रम शक्ती सेंटर यांच्या वतीने आयोजित होलिका दहन सोहळ्यासाठी शेकडो भाविक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी परिषदेकडून पूर्वपरवानगीही घेण्यात आली होती. स्थानिक हिंदू कुटुंबे ज्यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही सहभाग होता. शांततेत उत्सव साजरा करत असताना काही धर्मांध मुस्लिमांनी कार्यक्रमस्थळी येऊन गोंधळ घातल्याची आणि उपस्थितांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. (London Holika Dahan)

मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाला दोन विद्यमान महापौर, हॅरो कौन्सिलचे पोर्टफोलिओ धारक, लंडन फायर ब्रिगेडचे कमांडर, माजी महापौर, नगरसेवक आणि लेबर गटाचे नेते उपस्थित होते. मात्र थोड्याच वेळात जवळील मशिदीतून काही धर्मांध मुस्लिमांचा गट आला आणि त्यांनी कार्यक्रमस्थळी स्पीकर्स ढकलून देत तसेच उत्सव साजरा करणाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला ते निघून गेले, परंतु नंतर सुमारे २० जणांसह परत येऊन त्यांनी उपस्थितांवर हल्ला केल्याचे सांगितले जाते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्ला करणाऱ्यांपैकी एकाला ताब्यात घेण्यात आले असून, तो सध्या पोलीस कोठडीत आहे. (London Holika Dahan)

सदर घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी येथील हिंदूंची मागणी आहे. आपल्या श्रद्धेचे शांततेत पालन करण्याचा अधिकार हा मूलभूत आहे आणि तो सर्व समुदायांसाठी समानपणे संरक्षित केला गेला पाहिजे. एखाद्या समुदायाला लक्ष्य केले जात असताना मौन बाळगून सामाजिक सौहार्द निर्माण होऊ शकत नाही. युकेमधील हिंदूंनाही इतर सर्वांप्रमाणेच सुरक्षितता, सन्मान आणि संरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (London Holika Dahan)




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक