मुंबई : (Seva Bharati) तिरुवनंतपुरम येथे संपन्न झालेल्या पोंगल तीर्थयात्रेपूर्वी सेवा भारतीद्वारा स्वच्छता यज्ञ मोहिम हाती घेण्यात आली होती. सुमारे पाच हजार स्वयंसेवक सहभागी झाले असून त्यामध्ये २००० महिलांचा समावेश होता. अंदाजे जगभरातून २५ लाखांहून अधिक महिला अट्टुकल पोंगल अर्पण करण्यासाठी आल्याचे सांगितले जाते. अट्टुकल पोंगल हा ‘महिलांचा सबरीमला’ म्हणूनही ओळखला जातो.(Seva Bharati)
सेवा भारतीने (Seva Bharati) गेल्या अनेक दशकांपासून पोंगलपूर्वी आणि नंतर स्वच्छतेची जबाबदारी सांभाळली आहे. महिला भाविकांसाठी पिण्याचे पाणी, पोंगाला पायसम बनवण्यासाठी इंधन आणि इतर आवश्यक साहित्यही पुरवले जाते. नुकत्याच संपन्न झालेल्या अट्टुकल पोंगल दरम्यान १०० केंद्रांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. अट्टुकल देवी मंदिर परिसरातील महापालिकेच्या २५ प्रभागांमध्ये स्वच्छता करण्यात आली. तसेच उत्सवाच्या पाच ते सहा दिवस आधी मंदिरात येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी व अन्नाचे वितरणही करण्यात आले.(Seva Bharati)
या स्वच्छता यज्ञाचे उद्घाटन भाजप नेते आणि शहराचे महापौर व्ही. व्ही. राजेश यांनी केले. उपमहापौर आशा नाथ, सेवा भारतीचे राज्य उपाध्यक्ष डी. विजयन आणि संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोहिमेचे नेतृत्व केले. ३ मार्च रोजी पोंगालाच्या दिवशी साधारण ५००० सेवा भारती कार्यकर्ते सेवा उपक्रमांत सहभागी झाले होते.(Seva Bharati)
२०१३ च्या पोंगाला उत्सवादरम्यान पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. त्यावेळी सीपीएम-नेतृत्वाखालील डाव्या आघाडीच्या काळात के. चंद्रिका या शहराच्या महापौर होत्या. त्या वेळी हजारो सेवा भारती (Seva Bharati) कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत अनेक वाहने व पाण्याचे टँकर तैनात करून पाण्याचा पुरवठा केला आणि यात्रा सुरळीत पार पाडली. त्यांच्या या सेवाकार्यासाठी राज्यभरातील भाविक व नागरिकांनी कौतुक केले होते.(Seva Bharati)
यंदा केरळ वॉटर अथॉरिटीतील डाव्या विचारसरणीच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत काही भाविक आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पोंगालापूर्वी शहरातील काही भागांत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केल्याचा आरोप आहे. ही परिस्थिती तीन ते चार दिवस आधीपासून सुरू झाल्याचे म्हटले जाते. भाजप-नेतृत्वाखालील शहर प्रशासनाने २०० हून अधिक पाण्याचे टँकर उपलब्ध करून देत पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला. महापौर व्ही. व्ही. राजेश यांच्या नेतृत्वाखालील महापालिका पथकाने १६० केंद्रांवर टँकर तैनात केले होते.(Seva Bharati)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक