Bihar Politics : बिहारमध्ये उलथापालथ! नितीश कुमार राज्यसभेवर; भाजपचा मुख्यमंत्री होणार?

    04-Mar-2026   
Total Views |

Bihar Politics

मुंबई : (Bihar Politics)
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड येत्या दोन दिवसांत घडण्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी भाजपने याद्या जाहीर केल्या आहेत. परंतु, यातच आता नितीश कुमार यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याच्या दावा केला जात आहे. राज्यसभेसाठी नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.(Bihar Politics)

जदयुमध्ये हालचालींना वेग

नितीश कुमार यांना राज्यसभेवर पाठविण्यासाठीची चर्चा जवळपास पूर्ण झाल्याची माहिती माध्यमांमधून समोर आली आहे. पक्षातंर्गत हालचालींना वेग आला आहे. राज्यसभा निवडणुकीची चर्चा सुरु झाल्यानंतर पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा आणि नितीश कुमार यांच्यात जवळपास तीन तास चर्चा झाली. प्रदीर्घ झालेल्या या बैठकीत राज्यसभा निवडणूक आणि इतर विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. केंद्रीय मंत्री लल्लन सिंग याबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी पटनामध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे.(Bihar Politics)

मुख्यमंत्रीपद भाजपाकडे जाणार?

नितीश कुमार राज्यसभेवर गेल्यास नवा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतच्या चर्चा सध्या बिहारच्या राजकीय वर्तुळात केल्या जात आहेत. नितीश कुमार राज्यसभेवर गेल्यास महागठबंधनमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रीपदावर दावा करु शकते, असा कयास राजकीय सूत्रांकडून बांधला जात आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी खांदेपालट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जदयुमधून रामनाथ ठाकूर यांचे नाव राज्यसभेसाठी जवळपास निश्चित असून, दुसरा उमेदवाराचे नाव हे अजूनही गुलदस्त्यात आहे.(Bihar Politics)
 
निशांत कुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद
 
या संपूर्ण सत्तानाट्यात सर्वात महत्त्वाची चर्चा ही नीतीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्याबद्दल होत आहे. आतापर्यंत निशांत कुमार हे राज्यसभेवर जातील अशी शक्यता होती, मात्र, बिहारच्या नव्या सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिले जाऊ शकते. राजकारणापासून दूर राहणारे निशांत कुमार गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात आणि वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अधिक सक्रिय दिसले होते. त्यामुळेच त्यांच्या राजकीय प्रवेशाची तयारी पूर्ण झाल्याचे बोलले जात आहे.(Bihar Politics)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\