मुंबई : (Rashtra Sevika Samiti) राष्ट्र सेविका समिती,(Rashtra Sevika Samiti) शरण्या आणि भारतीय विद्वत परिषद यांच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक संयुक्त पत्रकार परिषद संपन्न झाली. दि. ७ आणि ८ मार्च रोजी भारतातील महिला विचारवंतांचे ऐतिहासिक राष्ट्रीय संमेलन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘भारती – नारी ते नारायणी’ या नावाने विज्ञान भवन येथे होणाऱ्या या दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते होणार असून समारोप राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार आहे.(Rashtra Sevika Samiti)
राष्ट्र सेविका समितीच्या (Rashtra Sevika Samiti) प्रमुख कार्यवाहिका सीताक्का यांनी सांगितले की ‘भारती – नारी ते नारायणी’ हे केवळ घोषवाक्य नसून भारतीय स्त्रीशक्तीला एकत्र आणण्याचा संकल्प आहे. देशात महिलांच्या हक्कांसाठी अनेक संस्था कार्यरत असल्या तरी समिती संपूर्ण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करते, असे त्यांनी नमूद केले. तसेच पुरुषांविरुद्ध संघर्षाच्या भावनेवर आधारित पाश्चात्त्य ‘फेमिनिझम’ संकल्पनेशी समिती सहमत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Rashtra Sevika Samiti)
त्यांच्या मते, भारतीय दृष्टिकोनात स्त्री आणि पुरुष समान असून ते एकाच प्रकाशपुंजाच्या दोन ज्योती आहेत. समितीच्या स्वयंसेविका केवळ महिलांच्या उन्नतीपुरत्या मर्यादित न राहता सांस्कृतिक, नैतिक, आध्यात्मिक आणि आर्थिक दृष्ट्या संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करतात.(Rashtra Sevika Samiti)
भारतीय विद्वत परिषदेच्या सचिव डॉ. व्ही. शिवानी यांनी सांगितले की ‘भारती – नारी ते नारायणी’ ही महत्त्वाकांक्षी संकल्पना असून महिलांना मौन शक्तीपासून प्रभावी नेतृत्वकर्त्यांपर्यंत नेण्याचा उद्देश आहे. संमेलनात विद्या, शक्ती, मुक्ती, चेतना, प्रकृती, संस्कृती, सिद्धी आणि कृति या आठ प्रमुख विषयांवर चर्चा होणार आहे.(Rashtra Sevika Samiti)
अशी माहिती आहे की, चार विशेष पॅनेलद्वारे विविधांगी विचारमंथन यावेळी होणार आहे. त्यात महिला खासदारांचे राष्ट्रीय पॅनेल ‘पंच परिवर्तन’ या विषयावर चर्चा करेल. महिला कुलगुरूंचे स्वतंत्र पॅनेल आयोजित करण्यात येईल. ‘साध्वी संगम’ पॅनेलमध्ये योग, धर्म आणि अध्यात्म यांवर विचारविनिमय होईल. मुख्य संमेलनापूर्वी देशभरात या विषयावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यातून प्राप्त सूचनांसह संमेलनातील शिफारसी भारत सरकारच्या संबंधित विभागांकडे विचार आणि अंमलबजावणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे डॉ. शिवानी यांनी सांगितले.(Rashtra Sevika Samiti)
शरण्याच्या अध्यक्षा अंजू आहुजा यांनी सांगितले की हे संमेलन देशातील सर्व स्तरांतील महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. स्त्रीला ‘नारायणी’च्या स्तरावर प्रतिष्ठित करणे हे त्यांच्या संस्थेचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रसंगी राष्ट्र सेविका समितीच्या दिल्ली प्रांत प्रमुख रचना वाजपेयी यांनी सांगितले की संमेलनात राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका वंदनीय शांताक्का, साध्वी ऋतंभरा, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, धर्मेंद्र प्रधान, अन्नपूर्णा देवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.(Rashtra Sevika Samiti)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक