मुंबई : (Dedicated Freight Corridor Corporation of India Limited) डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसाठी (Dedicated Freight Corridor Corporation of India Limited) आजचा दिवस अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरला. पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गाचा संपूर्ण प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाल्याची मंगळवार, दि.३१ मार्च रोजी नोंद करण्यात आली. जेएनपीटी ते न्यू सफाळे (वैतरणा) या विभागावर मालगाड्यांची यशस्वी चाचणी धाव पूर्ण करत या प्रकल्पातील उर्वरित १०२ किमीचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला.(Dedicated Freight Corridor Corporation of India Limited)
मंगळवार, दि.३१ मार्च रोजी सकाळी ११:५० वाजता जेएनपीटीहून न्यू सफाळेकडे (डाउन दिशेने) इलेक्ट्रिक इंजिन द्वारा कंटेनर ट्रेन रवाना करण्यात आली, तर न्यू सफाळेहून जेएनपीटीकडे (अप दिशेने) डिझेल इंजिनच्या सहाय्याने कंटेनर ट्रेन सुटली. या यशस्वी चाचणीमुळे संपूर्ण मार्ग मालवाहतुकीसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट झाले.(Dedicated Freight Corridor Corporation of India Limited)
डीएफसीसीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार यांच्या नेतृत्वाखाली ही चाचणी पार पडली. उच्च क्षमतेचा, विद्युतीकरण केलेला आणि दुहेरी मार्ग असलेला हा आधुनिक कॉरिडॉर अखंड आणि कार्यक्षम मालवाहतुकीसाठी पूर्णपणे तयार असल्याचे या चाचणीतून सिद्ध झाले.(Dedicated Freight Corridor Corporation of India Limited)
या प्रसंगी संचालक (ऑपरेशन्स व बिझनेस डेव्हलपमेंट) शोभित भटनागर, संचालक (इन्फ्रास्ट्रक्चर) अनुराग शर्मा, कार्यकारी संचालक (इन्फ्रास्ट्रक्चर) एम. के. अवस्थी, कार्यकारी संचालक (प्रोजेक्ट्स) संदेश श्रीवास्तव, जीजीएम विकास श्रीवास्तव, जीजीएम (इलेक्ट्रिकल) रणविजय सिंह, जीएम अमित सौरस्त्री, तसेच सीजीएम (मुंबई) एच. जी. तिवारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि डीएफसीसीआयएलची टीम उपस्थित होती.(Dedicated Freight Corridor Corporation of India Limited)
या प्रकल्पामुळे भारताच्या लॉजिस्टिक्स क्षेत्रात नवे पर्व सुरू होणार आहे. बंदरांशी अधिक वेगवान संपर्क, पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढ, तसेच पर्यावरणपूरक आणि विश्वासार्ह मालवाहतूक यामुळे देशाच्या आर्थिक वाढीस चालना मिळणार आहे.(Dedicated Freight Corridor Corporation of India Limited)
पूर्ण कॉरिडॉर सुरू झाल्याने न्यू मकरपुरा ते न्यू जेएनपीटी या मार्गावर ट्रेन ऑपरेशन्स अधिक सुलभ होणार असून, क्रू बदलण्याची आवश्यकता कमी होऊन केवळ दोन संचांमध्ये कामकाज पार पडेल. याशिवाय, मालगाड्यांचा प्रवास कालावधी सुमारे चार तासांनी कमी होणार असून, यामुळे रोलिंग स्टॉकचा जलद वापर, वेळापत्रकातील अचूकता आणि वाढत्या मालवाहतुकीसाठी अधिक क्षमता उपलब्ध होणार आहे.(Dedicated Freight Corridor Corporation of India Limited)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.