Mohammad Tahir Anwar : बहावलपुरात मसूद अझहरच्या भावाचा संशयास्पद मृत्यू!

‘अज्ञात घटकाचा’ सहभाग असण्याची शक्यता?

    31-Mar-2026   
Total Views |
Mohammad Tahir Anwar
 
मुंबई : (Mohammad Tahir Anwar) दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याचा भाऊ मोहम्मद ताहिर अन्वर (Mohammad Tahir Anwar) याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानातील बहावलपूर येथे ही घटना घडली. या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सदर घटनेनंतर परिसरात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळतेय.(Mohammad Tahir Anwar)
 
मिळालेल्या माहितीनुसार, ताहिर अन्वरच्या (Mohammad Tahir Anwar) मृत्यूची पुष्टी जैश-ए-मोहम्मदच्या अधिकृत माध्यमांतून करण्यात आली. मात्र, मृत्यूचे कारण जाहीर करण्यात आलेले नाही. आजार, हल्ला किंवा अन्य कोणत्याही घटनेचा उल्लेख न केल्यामुळे या प्रकरणाबाबत संशय अधिक गडद झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा बहावलपूर येथील एका मशिदीत ताहिर अन्वर याचे दफन करण्यात आले.(Mohammad Tahir Anwar) 
 
संघटनेच्या ‘मरकज उस्मान-ओ-अली’ या मुख्यालय परिसरात मध्यरात्री नमाज-ए-जनाजा अदा करण्यात आली. यावेळी मसूद अझहरसह इब्राहिम अझहर, तल्हा अल सैफ, अब्दुर रऊफ आणि मोहम्मद अम्मार अलवी यांसारखे अनेक दहशतवादी उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे.(Mohammad Tahir Anwar) 
 
हेही वाचा : Samyukt Masih Samaj Chhattisgarh : धर्मस्वातंत्र्य विधेयकाविरोधातील आंदोलन ‘बोगस’; संयुक्त मसीह समाजाचा दावा 
 
ताहिर अन्वर (Mohammad Tahir Anwar) हा संघटनेतील एक प्रमुख पदाधिकारी मानला जात होता. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ तो दहशतवादी कारवायांच्या नियोजनात सक्रिय होता. २००१ नंतर अनेक प्रशिक्षण शिबिरे उभारणे व त्यांचे संचालन करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. शस्त्रसामग्री पुरवठा आणि लॉजिस्टिक व्यवस्थापनाची जबाबदारीही त्याच्याकडे होती, त्यामुळे तो संघटनेचा कणा मानला जात असे. जैश-ए-मोहम्मदमध्ये सहभागी होण्यापूर्वी तो पोल्ट्री व्यवसाय करत असल्याची माहिती आहे.(Mohammad Tahir Anwar)
 
मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने या प्रकरणाभोवती गूढता वाढली आहे. संबंधित संघटनेनेही मृत्यूबाबत कोणतीही ठोस माहिती न दिल्याने विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. या घटनेमागे अंतर्गत मतभेद किंवा एखाद्या ‘अज्ञात घटकाचा’ सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नसून, या प्रकरणाचा तपास आणि अधिक माहिती समोर येणे आवश्यक आहे.(Mohammad Tahir Anwar)
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक