Distribution of Senior Citizen Cards in Thane : ६७ पारशी बांधवांना ज्येष्ठ नागरिक कार्डचे वाटप
नगरसेविका नम्रता कोळी यांचा उपक्रम
31-Mar-2026
Total Views |
ठाणे : (Distribution of Senior Citizen Cards in Thane) प्रभाग क्र. २२ मध्ये वास्तव्य करणाऱ्या ६७ पारशी बांधवांना ज्येष्ठ नागरिक कार्डचे सोमवारी वाटप करण्यात आले.भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी व आई-बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी यांनी हा उपक्रम राबविला.(Distribution of Senior Citizen Cards in Thane)
ठाण्यातील अग्यारी लेन व टेंभी नाका परिसरासह प्रभागातील ज्येष्ठ पारशी बांधवांना आयुष्मान भारत कार्डचा लाभ देण्यासाठी नुकतेच विशेष जन आरोग्य शिबीर भरविण्यात आले होते. या शिबिरात ज्येष्ठ नागरिक कार्ड व ७० वर्षांवरील नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड देण्यासाठी नोंदणी करण्यात आली होती. आज ६७ स्त्री-पुरुष नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप करण्यात आले.
दरम्यान, प्रभाग क्र. २२ मधील ज्येष्ठ नागरिकांनी सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेविका नम्रता कोळी व जयेंद्र कोळी यांनी केले आहे.(Distribution of Senior Citizen Cards in Thane)