Maulana Abdullah Saleem : मौलाना अब्दुल्ला सलीम अटकेत!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आईबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून कारवाई

    31-Mar-2026   
Total Views |
Maulana Abdullah Saleem
 
मुंबई : (Maulana Abdullah Saleem) उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने सोमवारी संध्याकाळी बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातून मौलाना अब्दुल्लाह सलीम यास अटक केली. मौलाना अब्दुल्लाह सलीमने एका धार्मिक सभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आईबद्दल आणि गोमातेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बलरामपूर आणि बहराईचसह अनेक जिल्ह्यांत गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानुसार, साध्या वेशात पोहोचलेल्या एसटीएफने स्थानिक पोलिसांच्या मदतीसह मौलानाला ताब्यात घेतले.(Maulana Abdullah Saleem)
 
अटक प्रक्रियेदरम्यान घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. साध्या वेशातील पोलिसांनी मौलानाला घेऊन जाताना पाहून स्थानिकांना अपहरण झाल्याची शंका आली. मात्र, स्थानिक आमदारांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर ही कायदेशीर कारवाई असल्याचे स्पष्ट झाले. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिस मौलानाला घेऊन जाताना दिसत असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना उत्तर प्रदेशात आणण्यात आले आहे.(Maulana Abdullah Saleem)
 
हेही वाचा : Ashwini Bhide: मुंबईला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्त! कोण आहेत अश्विनी भिडे?  
 
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात मार्चच्या सुरुवातीला व्हायरल झालेल्या एका व्हिडिओपासून झाली. या व्हिडिओमध्ये मौलाना अब्दुल्ला सलीम आक्षेपार्ह भाषा वापरताना ऐकू येतात, ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. समाजात वैमनस्य निर्माण करणे आणि अभद्र वक्तव्ये करणे यांसारख्या कलमांखाली उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई सुरू केली. रमजान महिन्यात बिहारमध्ये झालेल्या एका धार्मिक सभेतील हा व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर हा वाद उफाळून आला.(Maulana Abdullah Saleem)
 
मौलानाच्या या वक्तव्यानंतर बलरामपूर, बस्ती, सीतापूर आणि कानपूरसह अनेक जिल्ह्यांत निदर्शने झाली, जिथे भाजप कार्यकर्त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली. भाजप आमदार सुरेंद्र दिलेर यांनीही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली. त्यांनी नमूद केले की, हा व्हायरल व्हिडिओ सांप्रदायिक सौहार्द बिघडवू शकतो. अभिनेते व खासदार रवि किशन यांनीही या वक्तव्यांचा निषेध करत भारतीय संस्कृतीत आईला सर्वोच्च स्थान असल्याचे सांगितले आणि असे वक्तव्य अस्वीकार्य असल्याचे नमूद केले.(Maulana Abdullah Saleem)
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक