Maharashtra Weather Alert : राज्यावर पुन्हा अवकाळीचे सावट! वादळी पाऊस, विजांचा कडकडाट अन् गारपीटीचा इशारा

    31-Mar-2026   
Total Views |

Maharashtra Weather Alert)


मुंबई : (Maharashtra Weather Alert) राज्यात मंगळवारी ३१ मार्चपासून पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढचे दोन दिवस गारपीट होण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Weather Alert)
 
हवामान विभागाकडून अलर्ट जारी!
 
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील पाच दिवस पावसाला पोषक हवामान राहणार असून, विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस जोरदार गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, विदर्भातही पुढचे दोन गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीज चमकणे, जोरदार वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Alert)

गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने राज्यात धुमाकूळ घालत जनजीवन विस्कळीत केले आहे. वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतमालासह घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. पुढील ४ दिवस पावसाची शक्यता असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी आणि नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य ती काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे. (Maharashtra Weather Alert)




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\