Things We Don't See Book Release : उद्योगपती आणि लेखक एल.सी. सिंग यांनी ‘थिंग्स वी डोन्ट सी’ या पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन

    31-Mar-2026
Total Views |

Things We Don
 
मुंबई : (Things We Don't See Book Release) उद्योगपती आणि लेखक एल.सी. सिंग यांनी मुंबई येथे आयोजित समारंभात आपल्या ‘थिंग्स वी डोन्ट सी’ (Things We Don't See Book Release) या आत्मचरित्राचे प्रकाशन केले. हा कार्यक्रम अनेक नामांकित उद्योग नेते आणि मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला रोथ्सचाइल्ड इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आलोक शाह, नॅसकॉमचे संस्थापक हरीश मेहता, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे सह-संस्थापक रामदेव अग्रवाल, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग , टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी एस. महालिंगम आणि टीसीएसचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष निर्मल जैन उपस्थित होते. याशिवाय अनेक उद्योग क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित व्यक्ती तसेच लेखकाचे कुटुंबीय आणि जवळचे सहकारीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या पुस्तकामध्ये लेखकानी त्यांच्या आयुष्यातील वैयक्तिक अनुभव मांडला आहे. कल्पनाशक्ती, अडचणी, मोठी स्वप्ने आणि दिसणाऱ्या यशापलीकडे आयुष्याचा खरा अर्थ शोधण्याचा त्यांचा प्रवास या पुस्तकातून सांगितला आहे.(Things We Don't See Book Release)
 
हा कार्यक्रम भावनिकदृष्ट्याही खास ठरला, कारण या पुस्तकामागील भावनिक समर्पणालाही यावेळी मान देण्यात आला. यावेळी श्रीमती स्वर्णा कोहली (स्वर्गीय श्री. एफ. सी. कोहली यांचे प्रतिनिधित्व करत), एल.सी. सिंग यांच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावणारे त्यांचे बंधू यू.सी. सिंग, तसेच त्यांची मुलगी स्वाती (स्वतः, तिची बहीण निमिषा आणि स्वर्गीय श्रीमती मनोरमा –  एल.सी. सिंग यांची पत्नी – यांचे प्रतिनिधित्व करत) उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक भावनिक झाला आणि आठवणी, विचार आणि कृतज्ञतेने भरलेली ही संध्याकाळ अधिक खास बनली.(Things We Don't See Book Release)
 
‘थिंग्स वी डोन्ट सी’ हे पुस्तक एका छोट्या गावातील मुलाच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी सांगते, ज्याने आपल्या नजरेपलीकडील मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस केले. बालपणातील उत्सुकता आणि आश्चर्याने भरलेल्या आठवणींपासून ते पुढे उच्चस्तरीय व्यवस्थापन मंडळ (बोर्डरूम) आणि जागतिक पातळीवरील कामापर्यंतचा त्यांचा प्रवास या आत्मचरित्रात मांडला आहे. या पुस्तकात सिंग यांच्या आयुष्यातील वेगवेगळे अनुभव सांगितले आहेत. हे पुस्तक फक्त यशाची कहाणी नाही, तर त्या मागील संघर्ष, प्रश्न आणि प्रगती यांचाही प्रवास आहे. आयुष्यातील यशापेक्षा त्यामागील खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकात दिसतो.(Things We Don't See Book Release)
 
हे पुस्तक फक्त त्यांच्या आयुष्यातील टप्पे सांगत नाही, तर एका व्यक्तीच्या प्रवासाला आकार देणाऱ्या अदृश्य गोष्टींचाही शोध घेते. यात संघर्ष, आत्मविश्वास आणि जीवनातील उद्देश व शांतता शोधण्याचा वैयक्तिक प्रवास मांडला आहे. या आत्मचरित्रातून . एल.सी. सिंग यांनी स्वतःचे अनुभव आणि अंतर्मुख विचार एकत्र मांडले आहेत. ओळख, महत्त्वाकांक्षा आणि बाहेरून यशस्वी दिसणाऱ्या आयुष्यातही अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या सत्यांवर हे पुस्तक वाचकांना विचार करायला भाग पाडते.(Things We Don't See Book Release)
 
हेही वाचा : Israel : इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी दहशतवाद्यांना थेट मृत्युदंडाची शिक्षा; संसदेत कायदा मंजूर! 
 
पुस्तक प्रकाशनावेळी बोलताना एल.सी. सिंग म्हणाले, “मी हे पुस्तक फक्त माझा प्रवास सांगण्यासाठी लिहिले नाही. तर तो अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी लिहिले आहे. कालांतराने मला जाणवले की आयुष्य फक्त आपण साजरे केलेल्या क्षणांनीच घडत नाही, तर आपण जगताना दुर्लक्षित केलेल्या अनेक छोट्या क्षणांनीही घडत असते. बनारसपासून बोर्डरूमपर्यंत आणि आयुष्यात मी निभावलेल्या विविध भूमिकांमध्ये, अनेकदा त्या शांत क्षणांनी, त्यातील प्रश्नांनी आणि विचारांनी माझ्यावर जास्त प्रभाव टाकला. या पुस्तकाच्या माध्यमातून मी त्या न दिसणाऱ्या क्षणांकडे पुन्हा वळून पाहण्याचा आणि ते आपल्याला कसे घडवतात हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.”(Things We Don't See Book Release)
 
या कार्यक्रमात एल.सी. सिंग आणि किरण खलाप यांच्यात एक विशेष संवाद (फायरसाईड चॅट) देखील झाला. या संवादातून पुस्तकातील विचार अधिक स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने समजले. प्रेक्षकांना आयुष्याचा उद्देश, स्वतःचा शोध आणि वेळेनुसार समोर येणाऱ्या शांत सत्यांवर विचार करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (लाइव्हस्ट्रीम) देखील करण्यात आले होते, ज्यामुळे सिंग यांचे जवळचे सहकारी, उद्योग क्षेत्रातील मित्र आणि त्यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांतील लोक, जे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, ते जिथे कुठे होते तिथून या कार्यक्रमाचा भाग बनू शकले.(Things We Don't See Book Release)
 
‘थिंग्स वी डोन्ट सी’ या पुस्तकाद्वारे एल.सी. सिंग वाचकांना फक्त त्यांच्या आयुष्याची कहाणी सांगत नाहीत, तर एक विचार करायला लावणारा आणि मानवी अनुभवांनी भरलेला प्रवास दाखवतात. स्वप्न पाहणे, अडचणींना सामोरे जाणे, काहीतरी निर्माण करणे आणि शेवटी स्वतःकडे पाहण्याचा अर्थ काय असतो, हे ते या पुस्तकातून सांगतात. या पुस्तकातील प्रामाणिकपणा आणि सखोल विचार वाचकांच्या मनावर कायमची छाप सोडतात आणि हे दाखवतात की आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी अशा असतात, ज्या लगेच किंवा सहजपणे दिसत नाहीत.(Things We Don't See Book Release)