Assam Manifesto : यूसीसी, घुसखोरीवर कारवाई ते ५ लाख कोटींची गुंतवणूक!

भाजप आसामचा जाहीरनामा प्रकाशित; दिली ३१ मोठी आश्वासने

    31-Mar-2026   
Total Views |
Assam Manifesto

मुंबई : (Assam Manifesto) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी आसाम विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रकाशित केला.(Assam Manifesto) यामध्ये आसामच्या मूळ रहिवाशांची जमीन, वारसा आणि प्रतिष्ठा यांचे संरक्षण करण्याची ग्वाही त्याचबरोबर पायाभूत सुविधांमध्ये ५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे आश्वासन अशी एकूण ३१ मोठी आश्वासने देण्यात आली आहेत. मुख्यत्वे बांगलादेशी घुसखोरांनी बळकावलेली जमीन परत मिळवणे, समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करणे, अशा बाबींचाही यात समावेश आहे.(Assam Manifesto)
 
या प्रसंगी बोलताना निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, भाजप सरकारच्या कार्यकाळात आसामच्या अर्थव्यवस्थेने वेगाने प्रगती केली. काँग्रेसचे ईशान्य भारताच्या दीर्घकालीन विकासाकडे कोणतेही लक्ष नव्हते; कारण त्यांचे राजकारण नेमक्या याच गोष्टीवर अवलंबून असते. आसाममधील अनेक तरुण व्यावसायिक आपली जागतिक स्तरावरील कारकीर्द सोडून आसाममध्ये परत येत आहेत. हे ते कोणत्याही सक्तीमुळे करत नसून, येथे उपलब्ध असलेल्या संधींमुळे करीत आहेत.(Assam Manifesto)
 
पुढे त्या म्हणाल्या की, २०१५-१६ मध्ये आसामचे सकल राज्य देशांतर्गत उत्पादन (जीएसडीपी) २.२४ लाख कोटी रुपये इतके होते, तर आज ते ७.४१ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेय. २०२०-२१ मध्ये दरडोई उत्पन्न १.०३ लाख रुपये होते, तर २०२४-२५ मध्ये ते १.५९ लाख रुपयांवर पोहोचलेय. म्हणजेच अवघ्या चार वर्षांत यात ५४ टक्क्यांची वाढ झालीय."(Assam Manifesto)
 
गुवाहाटी येथील आसाम भाजप कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आपल्या जाहीरनाम्याला पक्षाने 'संकल्प पत्र' असे नाव दिले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि आसाम भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप सैकिया यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित केला.(Assam Manifesto)
 
हेही वाचा : Ashok Kharat case: ४ मोबाईल, VIP नेटवर्क आणि आता पत्नीवरही गुन्हा...! भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटीचा मोठा स्फोट 
 
समान नागरी संहिता लागू केली जाईल...
 
आसाम भाजपने स्पष्ट केले की, सत्तेत आल्यास राज्यात समान नागरी संहिता लागू केली जाईल आणि घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करून त्यांनी बळकावलेली जमीन परत मिळवली जाईल. त्याचबरोबर राज्यात ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’विरोधात कडक कायदे केले जातील. याप्रसंगी तरुणांसाठीही मोठी घोषणा करण्यात आली असून, पुढील ५ वर्षांत २ लाख सरकारी नोकऱ्या आणि एकूण १० लाख रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील. तसेच प्रत्येक जिल्ह्यात एक विद्यापीठ, वैद्यकीय महाविद्यालय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.(Assam Manifesto)
 
महिलांसाठी ‘लखपती दीदी’ योजना
 
महिला मतदारांसाठी ‘अरुणोदोई’ योजनेअंतर्गत मिळणारी मासिक रक्कम १२५० रुपयांवरून थेट ३ हजार रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय ‘लखपती दीदी’ योजनेद्वारे ४० लाख महिलांना २५ हजार पर्यंत आर्थिक मदत देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा मानस आहे. गरिब कुटुंबांना आवश्यक धान्य मोफत देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.(Assam Manifesto)
 
पूरमुक्त आसाम आणि पायाभूत सुविधांवर मोठी गुंतवणूक
 
आसाममधील सर्वात मोठी समस्या असलेल्या पूरस्थितीवर मात करण्यासाठी भाजपने मास्टर प्लॅन तयार केला आहे. पहिल्या दोन वर्षांत राज्य पूरमुक्त करण्यासाठी १८ हजार कोटी रुपये खर्च केले जातील. तसेच रस्ते, रेल्वे आणि हवाई संपर्क सुधारण्यासाठी एकूण ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.(Assam Manifesto)
  
चहा बागायती कामगारांसाठी मोठी घोषणा
 
आसामची ओळख असलेल्या चहा बागायती कामगारांसाठीही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पुढील ५ वर्षांत त्यांचा रोजंदारीचा दर वाढवून ५०० रुपये प्रति दिवस करण्याचे वचन देण्यात आले आहे. तसेच सर्व कामगारांना जमिनीचा मालकी हक्क (पट्टा) दिला जाईल आणि केंद्र सरकारच्या योजनांद्वारे त्यांना पक्की घरे उपलब्ध करून दिली जातील.(Assam Manifesto)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक