US-Israel-Iran War: कुवेतमध्ये इराणचा भीषण हल्ला! आणखी एका भारतीय कामगाराचा मृत्यू; ऊर्जा प्रकल्पाचं मोठं नुकसान

    30-Mar-2026   
Total Views |

US-Israel-Iran War

मुंबई : (US-Israel-Iran War) पश्चिम आशियातील संघर्षाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक भीषण होत चालली असून त्याचा थेट फटका भारतीय नागरिकांना बसत आहे. सोमवारी पहाटे कुवेतमध्ये एका ऊर्जा आणि जल शुद्धिकरण प्रकल्पावर इराणने केलेल्या हल्ल्यात एका भारतीय कामगाराचा मृत्यू झाला. या ताज्या घटनेमुळे या युद्धात जीव गमावलेल्या भारतीय नागरिकांची एकूण संख्या आता आठ झाली आहे.(US-Israel-Iran War)

जल शुद्धीकरण प्रकल्पाला लक्ष्य

कुवेतच्या ऊर्जा आणि जल मंत्रालयाने 'एक्स'वर माहिती देताना सांगितले की, इराणी हल्ल्यात प्रकल्पातील इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, याला "पापी इराणी आक्रमण" असे संबोधले आहे. तांत्रिक आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आली असून, पाणी पुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कुवेतच्या वीज, पाणी आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रवक्त्या इंजिनिअर फातिमा अब्बास जोहर हयात यांनी एका निवेदनाद्वारे या हल्ल्याची पुष्टी केली.(US-Israel-Iran War)

सद्यस्थितीत तांत्रिक आणि मदत पथकांकडून तात्काळ काम सुरू झाले आहे. प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यात आला असून या घटनेमुळे मध्यपूर्वेतील तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(US-Israel-Iran War)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\