Nitish Kumar Resignation : राज्यसभा प्रवेशानंतर मोठा निर्णय! नितीश कुमारांचा विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा

    30-Mar-2026   
Total Views |

Nitish Kumar

मुंबई : (Nitish Kumar Resignation) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेवर निवडून आल्यानंतर महत्त्वाचा निर्णय घेत विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा विधान परिषदेचे सभापती अवधेश नारायण सिंह यांच्याकडे सोपवला असून तो मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे बिहारच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Nitish Kumar Resignation)

नितीश कुमार यांचा राजीनामा विजय चौधरी आणि आमदार संजय गांधी यांनी विधान परिषदेत आणला. मुख्यमंत्र्यांनी आपले त्यागपत्र २९ शब्दांत पाठवले आहे. मंत्री विजय चौधरी म्हणाले, मुख्यमंत्री राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. ही तर संवैधानिक प्रक्रिया आहे. आज त्यांना राजीनामा द्यायचा होता. त्यांचे त्यागपत्र आमदार संजय गांधी यांनी विधान परिषदेचे सभापती अवधेश नारायण सिंह यांच्याकडे सुपूर्द केले आहे.(Nitish Kumar Resignation)
 
खरंतर, नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नियमांनुसार, राज्यसभेवर निवडून आल्यानंतर त्यांना विधान परिषदेचा राजीनामा देणे आवश्यक असते. विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतरही नितीश कुमार सहा महिने मुख्यमंत्रीपदी राहू शकतात. त्यामुळे आता ते मुख्यमंत्रीपदावरून कधी पायउतार होतील, हा प्रश्न अनुत्तरित आहे.(Nitish Kumar Resignation)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\