मुंबई : (Iran Crisis) इराणमधील तेहरान येथे वाढत्या सुरक्षाधोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने तातडीने पावले उचलली आहेत. अनेक भारतीय विद्यार्थ्यांना शहराबाहेरील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. परिसरातील जलद बदलणाऱ्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत दूतावासाने वाहतूक, अन्न आणि निवासाची संपूर्ण व्यवस्था केली. (Iran Crisis)
दूतावासाच्या मदतीला नकार देणारे काही विद्यार्थी अद्याप तेहरानमध्येच असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेवरही सतत लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या इतर भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना जिथे आहेत तिथेच थांबण्याचा, शक्य असल्यास घरात राहण्याचा, तसेच खिडक्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दूतावासाने जारी केला आहे. प्रदेशातील तणावपूर्ण घडामोडींमुळे अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (Iran Crisis)
परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे दूतावासाने स्पष्ट केले आहे. (Iran Crisis)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\