मुंबई : (Narendra Modi) "पूर्वी नोएडा लुटीचे केंद्र बनले होते पण आता भाजप सरकारच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश विकासाचे इंजिन बनला आहे", असे गौरवोद्गार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार, दि.२८ मार्च रोजी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होते. (Narendra Modi)
सुमारे ११,२०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेलद्वारे उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील हवाई संपर्कात मोठी वाढ होणार आहे. दिल्ली एनसीआरसाठी हे दुसरे आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार ठरणार असून सध्या प्रचंड ताण सहन करणाऱ्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करण्यास मदत होईल. (Narendra Modi)
विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी १.२ कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. भविष्यातील टप्प्यांमध्ये ही क्षमता ७ कोटी प्रवाशांपर्यंत वाढवण्याची योजना आहे. ३,९०० मीटर लांबीच्या धावपट्टीमुळे मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे शक्य होणार आहेत. अत्याधुनिक नेव्हिगेशन प्रणाली आणि ‘इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम’ मुळे कोणत्याही हवामानात २४x७ सेवा सुरू ठेवता येणार आहे. या विमानतळावर अत्याधुनिक मालवाहतूक केंद्राचाही समावेश असून, सुरुवातीला दरवर्षी २.५ लाख मेट्रिक टन माल हाताळण्याची क्षमता आहे. पुढील टप्प्यांत ती १८ लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढवली जाणार आहे. यामुळे उत्तर भारतात लॉजिस्टिक्स आणि व्यापाराला मोठी चालना मिळेल. (Narendra Modi)
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज मी जिकडे पाहतो तिकडे उत्साही आणि ऊर्जेने भरलेले युवा दिसत आहेत. या तरुणांना माहिती आहे की हा प्रकल्प त्यांच्या भविष्याला नवी पंख देणार आहे. आज आपण ‘विकसित यूपी, विकसित भारत’ या अभियानाचा एक नवीन अध्याय सुरू करत आहोत. उत्तर प्रदेश आता देशातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या राज्यांपैकी एक बनले आहे". (Narendra Modi)
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "या विमानतळाचा शिलान्यास करण्याचा आणि त्याचे उद्घाटन करण्याचा सन्मानही मला मिळाला याचा मला विशेष आनंद आहे. ज्या राज्याने मला आपला प्रतिनिधी म्हणून निवडले, त्या राज्याची ओळख आता या भव्य विमानतळामुळे अधिक बळकट होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.” (Narendra Modi)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.