INS Sudarshini: आयएनएस सुदर्शिनी वेधणार जगाचे लक्ष; आयएनएस सुदर्शिनीचे फ्रान्समधील सेते येथे आगमन

Total Views |
 
INS Sudarshini
 
मुंबई : (INS Sudarshini) भारतीय नौदलाची नौकानयन प्रशिक्षण जहाज ‘आयएनएस सुदर्शिनी’ आता फ्रान्समधील जागतिक प्रदर्शनीत जगाचे लक्ष वेधणार आहे. या लक्षवेधी नौकेचे ‘लोकायन-२६’ या ऐतिहासिक महासागरी मोहिमेअंतर्गत दि. २६ मार्च २०२६ रोजी फ्रान्समधील ऐतिहासिक सेते (Sète) बंदरावर आगमन केले. या भेटीमुळे जहाजाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून भारताच्या सागरी सहकार्य आणि सांस्कृतिक कूटनीतीच्या बांधिलकीचेही प्रदर्शन झाले आहे. (INS Sudarshini)
 
सेते येथे मुक्कामादरम्यान आयएनएस सुदर्शिनी प्रतिष्ठित ‘एस्काल आ सेते’ (Escale à Sète) या सागरी महोत्सवात सहभागी होणार आहे. हा महोत्सव युरोपमधील पारंपरिक मोठ्या जहाजांचा आणि सागरी समुदायांचा एक महत्त्वपूर्ण मेळावा मानला जातो. या माध्यमातून भारताच्या समृद्ध सागरी परंपरेचे जागतिक स्तरावर दर्शन घडवण्याची तसेच आंतरराष्ट्रीय मैत्री आणि नौदल सहकार्य अधिक दृढ करण्याची संधी मिळणार आहे. (INS Sudarshini)
 
सेते येथे पोहोचण्यापूर्वी आयएनएस सुदर्शिनीने सलालाह (ओमान), सफागा आणि अलेक्झांड्रिया (इजिप्त) तसेच वॅलेटा (माल्टा) या बंदरांना यशस्वी भेटी दिल्या. या संपूर्ण प्रवासात जहाजाने सुमारे ५,५०० सागरी मैलांचा प्रवास केला आहे. या प्रवासादरम्यान आयएनएस सुदर्शिनीने ‘फ्लोटिंग अॅम्बेसेडर’ म्हणून भारताच्या समृद्ध सागरी वारशाचे प्रदर्शन करत जागतिक समुदायाशी संवाद साधण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. (INS Sudarshini)
  

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.