मालवणीत रामभक्तांवर धर्मांध मुस्लिमांचा हल्ला

भगवे झेंडे-पताके लावल्याने मुस्लिम महिलेला पोटशूळ

    27-Mar-2026   
Total Views |
Ram Navami Celebrations
 
मुंबई : (Ram Navami Celebrations) रामनवमीच्या पूर्वसंध्येला मालवणी परिसरात रामनवमीच्या तयारीदरम्यान इस्लामिक कट्टरपंथींकडून हिंदूंवर हल्ला झाल्याची घटना समोर आली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. रामभक्तांकडून परिसरात भगवे झेंडे आणि पताका लावण्याचे काम सुरू असताना एका मुस्लिम महिलेनं अचानक येत रामभक्तांवर हात उचलल्याचे दिसतेय. त्यानंतर परिसरात मोठी गर्दी जमल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसरात बॅरिकेडिंग करत कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना त्यावेळी सुरू झाली, जेव्हा हिंदू संघटनांचे कार्यकर्ते रामनवमी निमित्त रस्त्यावर झेंडे लावत होते. ते मशिदीसमोरील रस्त्यावर पोहोचताच तेथील इस्लामीक कट्टरपंथींनी याला विरोध केला. क्षणातच दोन्ही गट आमनेसामने आले आणि परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे, कारण विरोध सुरू होताच मोठ्या संख्येने लोक तेथे जमा झाले आणि रामभक्तांना धमकावू लागले.
 
हेही वाचा : देशाच्या कानाकोपऱ्यात रामनामाची गंगा अखंडपणे वाहतेय : मोहन सालेकर
 
घटनास्थळी पोलीस दाखल होताच त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. ‘सकल हिंदू समाजा’तर्फे काही मुस्लिम व्यक्तींविरुद्ध लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, त्यात जीवघेणा हल्ला आणि दंगल घडवून आणण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. मालवणी परिसर आधीपासून संवेदनशील मानला जात असल्याने, रामनवमीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या प्रशासनाने परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला असून, ड्रोनच्या सहाय्यानेही परिस्थितीवर नजर ठेवली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शांतता प्रस्थापित आहे. तसेच कोणत्याही अनुचित घटनेला आळा घालण्यासाठी संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक