लॉकडाऊनबद्दल अफवा पसरवाल तर कठोर कारवाई करू! मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट इशारा

    27-Mar-2026
Total Views |
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) मुंब्रा येथील एका तरुणाने लॉकडाऊनबद्दल पसरवलेल्या अफवेमुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अशा अफवा पसरवणाऱ्यांबद्दल कठोर शब्दांत इशारा दिला आहे. वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा परिणाम सामान्य नागरिकांवर होऊ नये यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर (Excise Duty) प्रति लिटर १० रुपयांनी कमी केला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या निर्णयामुळे इंधन दरवाढीचा अतिरिक्त भार ग्राहकांवर पडणार नसून तेल कंपन्या आणि केंद्र सरकार हा खर्च उचलणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
 

राज्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले. देशात सुमारे एक महिन्याचा इंधन साठा उपलब्ध, साठेबाजीमुळे कृत्रिम टंचाई निर्माण होण्याचा धोका फडणवीस यांनी सांगितले की, शेजारील देशांमध्ये इंधन संकट असताना भारताने प्रभावी व्यवस्थापन केले आहे.
 


 
ते म्हणाले, “कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. २०% वरून ४०% पुढे ५०% पर्यंत वाढ घरगुती गॅस पुरवठा सुरळीत असल्याचेही त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. व्हॉट्सअप फॉरवर्डही गुन्हा ठरू शकतो, अशा प्रकरणात फौजदारी कारवाई देखील केली जाऊ शकते.”, असे म्हणत देशात पुन्हा लॉकडाउन लागू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून अफवा पसरवू नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. इंधन दरवाढ रोखण्यासाठी केंद्राचे पाऊल, पुरेसा साठा आणि अफवांवर कारवाई या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरू नये, असा स्पष्ट संदेश फडणवीस यांनी दिला.
 

खरात प्रकरणात काय म्हणाले मुख्यमंत्री?
 

व्हायरल व्हिडिओंची चौकशी सुरू असून महिला पीडितांना संरक्षण देण्यात येणार आहे. आक्षेपार्ह कंटेंट अपलोड करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. तसेच अशा व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांवर नवीन एफआयआर देखील केली जाऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.