Nirav Modi Plea Rejected: नीरव मोदीला मोठा झटका! पुन्हा सुनावणीसाठी लंडन कोर्टाचा नकार

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड!

    26-Mar-2026   
Total Views |

Nirav Modi

मुंबई : (Nirav Modi Plea Rejected)
फरार उद्योगपती नीरव मोदी याला मोठा धक्का बसला आहे. लंडनमधील उच्च न्यायालयाने भारतात प्रत्यार्पण रोखण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर पुन्हा सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. या कायदेशीर विजयामुळे नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग आणखी मोकळा झाल्याचे मानले जात आहे.(Nirav Modi Plea Rejected)
 
१३ हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या नीरव मोदीने, त्याला भारतात प्रत्यार्पणासाठी पाठवण्यासंदर्भातील खटला पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती. मात्र त्याची भारतात होणाऱ्या प्रत्यार्पणाला आव्हान देणारी याचिका लंडन उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.(Nirav Modi Plea Rejected)
 
नीरव मोदी हा एक फरार आर्थिक गुन्हेगार असून, मामा मेहुल चोक्सी याच्यासोबत पंजाब नॅशनल बँकेची (PNB) फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर भारतात खटला सुरू आहे. एकट्या नीरव मोदीवर ६,४९८.२० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. १९ मार्च २०१९ पासून नीरव मोदी हा ब्रिटनच्या न्यायालयात तुरुंगवासात आहे.(Nirav Modi Plea Rejected)
 
नीरव मोदीने यापूर्वी उच्च न्यायालयाच्या किंग्ज बेंच खंडपीठात एक याचिका दाखल केली होती. क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसच्या वकिलांनी, केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (CBI) पथकाच्या मदतीने, त्याच्या याचिकेच्या विरोधात युक्तिवाद सादर केला. तपास अधिकाऱ्यांसह सीबीआय अधिकाऱ्यांचे एक पथक सुनावणीसाठी लंडनला गेले होते.(Nirav Modi Plea Rejected)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\