Iran Rejects US Peace Proposal : "युद्ध तेव्हाच संपेल जेव्हा..." इराणचा अमेरिकेला इशारा! १५ कलमी शांतता प्रस्ताव फेटाळला

    26-Mar-2026   
Total Views |
Iran Rejects US Peace Proposal

मुंबई : (Iran Rejects US Peace Proposal)
पश्चिम आशियातील युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानकरवी पाठवलेला १५ कलमी शांतता प्रस्ताव इराणने बुधवारी फेटाळून लावला आहे. हा प्रस्ताव अवाजवी असल्याचे सांगत इराणने स्वतःचा पाच कलमी युद्धविराम प्रस्ताव अमेरिकेपुढे ठेवला. या युद्धात झालेल्या नुकसानाची भरपाई आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील सार्वभौमत्वाची मागणी इराणने या प्रस्तावाद्वारे केली आहे. या अटी मान्य केल्या तरच युद्ध थांबवण्याचा इशारा इराणकडून देण्यात आला.(Iran Rejects US Peace Proposal)

युद्धसमाप्तीची वेळ अमेरिका नव्हे, तर आम्ही ठरवू

युद्ध समाप्तीसंदर्भात अमेरिकेच्या प्रस्तावाची समीक्षा सुरू असल्याचे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले आहे. मात्र, अमेरिकेसोबत थेट चर्चा करण्याचा कोणताही इरादा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मध्यस्थांमार्फत संदेशांची देवाणघेवाण झाली असली तरी त्याला औपचारिक वाटाघाटी म्हणता येणार नाही, असंही ते म्हणाले. इराणने अमेरिकेने पाठवलेला १५ कलमी प्रस्ताव फेटाळत युद्धसमाप्तीची वेळ अमेरिका नव्हे, तर आम्ही ठरवू, अशी प्रतिक्रिया दिली. इराण स्वतःहून ठरवेल आणि जेव्हा त्यांच्या अटी पूर्ण होतील, तेव्हाच हे युद्ध संपेल, असे इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले.(Iran Rejects US Peace Proposal)

होर्मुझ सामुद्रधुनी भारतासह मित्रदेशांसाठी खुली

दरम्यान, होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद नसून भारत, चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तानसारख्या देशांसाठी खुली असल्याचं इराणने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी मध्य पूर्वेतील संघर्ष तात्काळ थांबवण्याचं आवाहन पुन्हा केले आहे.(Iran Rejects US Peace Proposal)

इराणच्या पाच अटी:

१) युद्धामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईची हमी.
२) आक्रमण आणि हत्या थांबवणे.
३) इराणविरुद्ध पुन्हा युद्ध होणार नाही याची ठोस हमी.
४) इराणविरुद्ध आणि संपूर्ण प्रदेशातील सर्व प्रतिकार गटांविरुद्धचे युद्ध समाप्त करणे.
५) होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराणच्या सार्वभौमत्वाला आंतरराष्ट्रीय मान्यता.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\