नवी दिल्ली : (India lockdown news) मध्य-पूर्वेतील युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर देशात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. मात्र, या दाव्यांना कोणताही आधार नसून पंतप्रधानांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.(India lockdown news)
नेमकी अफवा काय आहे?
पंतप्रधान मोदींनी संसदेत जागतिक संकटावर भाष्य करताना कोरोना महामारीच्या काळातील संकटाचा आणि त्यावेळच्या राष्ट्रीय एकतेचा दाखला दिला होता. सोशल मीडियावरील अनेक पोस्ट आणि ऑनलाइन चर्चांमध्ये असा दावा करण्यात आला की, पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या जागतिक परिणामांबद्दल बोलताना लॉकडाऊनच्या शक्यतेचा उल्लेख केला. यामुळे इंटरनेटवर "India lockdown again", "lockdown news", “भारतामध्ये पुन्हा लॉकडाऊन येणार का?”असे प्रश्न मोठ्या प्रमाणावर सर्च केले जाऊ लागले.(India lockdown news)
सहा वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीमुळे देशभरात पूर्णतः लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्याचा देशातील लोकांच्या जीवनात मोठा परिणाम झाला होता. इराण-इस्रायल-अमेरिकेच्या युद्धामुळे भारत आता पुन्हा एकदा लॉकडाउनच्या उंबरठ्यावर आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या. सरकारने या संकटाचा आणि त्याचा भारताच्या अर्थव्यवस्था व पुरवठा साखळीवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावल्याची घोषणा केली, तेव्हा या तर्क-वितर्कांना अधिक जोर मिळाला.(India lockdown news)
पंतप्रधान नेमके काय म्हणाले होते?
"सध्याची परिस्थिती चिंताजनक असून भारताची अर्थव्यवस्था, ऊर्जा सुरक्षा आणि देशातील नागरिकांवर दूरगामी परिणाम होतील. कोरोना महामारीच्या काळात भारत जसा सज्ज, सतर्क आणि एकजूट होता, त्याचप्रमाणे आताही असण्याची गरज आहे", पंतप्रधान मोदींच्या या विधानामुळे देशातील जनता चिंतेत पडली आहे. त्यांनी कुठेही लॉकडाऊन लागू करणार असल्याचे म्हटले नाही.(India lockdown news)
सत्य काय?
पंतप्रधान मोदींनी कुठलाही लॉकडाऊन जाहीर केलेला नाही.
केंद्र सरकारकडून अशा कोणत्याही निर्णयाची चर्चा देखील नाही.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्ट पूर्णतः दिशाभूल करणाऱ्या आहेत.
सरकारने नागरिकांना विनंती केली आहे की दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत स्त्रोतांकडूनच माहिती पडताळून बघावी.(India lockdown news)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\