ये बच्चे?

    26-Mar-2026   
Total Views |
Gandhi Statue
 
काल समाजमाध्यमांवर एक बातमी पाहिली. उत्तर प्रदेशातील बरेली येथे गोल टोपी घातलेली बालके, किशोरवयीन मुले ही खास ईदच्या दिवशी मजा करण्यासाठी फिरत होती. विशेष मजा, आनंद म्हणून त्यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना केली. त्यांच्या पुतळ्यासमोर अश्लील अविर्भाव केले, काही मुलांनी गांधीजींच्या पुतळ्याला विकृतपणे चारही बाजूंनी आक्षेपार्ह हावभाव करीत घेरले. ‘ईश्वर-अल्ला तेरो नाम रघुपती राघव राजाराम’ अशी खास ‘गंगा-जमुना-तेहजीब’ मानणारे महात्मा गांधीजी. त्यांच्याच पुतळ्यासोबत असे घडावे? या घटनेतील बालकांची विकृती चिंताजनक आहे. ‘बच्चे मन के सच्चे,’ असे म्हणतो, पण हे बच्चे तर भयंकर आहेत! कुठून येते ही विकृती?
 
या बालकांचे कृत्य पाहून एक घटना आठवली. काही वर्षांपूर्वी बालकांसाठी निःशुल्क संस्कार शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये ‘मलाही घ्या,’ म्हणत नऊ वर्षांचा अहमदही सहभागी झाला. शिबिराच्या पहिल्या दिवसाची सांगता ‘वन्दे मातरम्’ गाऊन केली. दुसर्‍या दिवशी अहमद शिबिराला आला नाही. पुढे कधीतरी तो भेटला. त्याला विचारले, "तू नंतर शिबिराला का आला नाहीस?” तर त्याचे म्हणणे, "दीदी, शिबीर में ‘वन्दे मातरम्’ बोलते हैं| इसलिए नही आया|” नऊ वर्षांचा, गरीब घरचा मुलगा, राहायचे-खायचे वांदे; पण त्याचे हे म्हणणे! या मुलाला हे कोणी सांगितले असेल? ‘कौम’शी बांधिलकी आणि कुराण-इस्लाम सोडून जगात काहीही सन्मान करण्यासारखे नाही, हे या बालकांना कोण सांगते? या असल्या मुलांच्या बाबतीत त्यांचे आई-बाप आणि शिक्षक काय संस्कार करतात? गांधीजींच्या पुतळ्याचा किंवा मागे कोळीवाड्यातील कोळी महापुरुषाच्या पुतळ्याचा अपमान करणारे हे लोक मूर्तिपूजेचे विरोधक आहेत, हे मान्य; पण म्हणून दुसर्‍यांच्या श्रद्धास्थानाचा अपमान ते कसे काय करू शकतात? हा काय मुघलकालीन भारत नाही. या प्रकरणात त्या बालकांच्या पालकांची काय भूमिका असेल? अर्थात, ‘बच्चा हैं, उसे क्या मालूम,’ हेच ते म्हणतील. पण, या ‘बच्चा’ला नेमके गैर-मुस्लीम असलेल्या प्रतीकांचाच अपमान कसा करता येतो? गांधीजींच्या पुतळ्याच्या विटंबना करणार्‍या या बालकांवर कारवाई होणे गरजेचे. कारण, शितावरून भाताची परीक्षा. या बालकांच्या टोळक्यांच्या हातात एखादी मुलगी सापडली असती तर?
 
 
हिंदू समाजाचे आभार!
 
 
त्याचं नाव ‘तौसिफ’ होतं, पण आडनाव ‘ठाणगे’ होतं. नेरळलाच राहात असल्यामुळे मराठीही चांगली येत होती. त्यामुळे त्याला भेटणार्‍याला प्रथमदर्शनी तो हिंदू, मराठी भाषिक वाटे. तौसिफचे लग्न झाले होते. त्याला चार मुले होती. पण, तरीही त्याने अनुसूचित जातीच्या १९ वर्षांच्या गरीब घरच्या विद्यार्थिनीला हिंदू आहोत आणि अविवाहित आहोत, असे भासवून फसवले. एका वर्षानंतर तिला कळले की तो मुसलमान असून त्याला चार मुले आहेत. उल्हासनगर आणि कल्याणच्या ‘सकल हिंदू समाज’ने या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी संघर्ष केला.
 
असो. तौसिफचे सत्य त्या मुलीला का कळाले नसेल? कारण, आपण मुसलमान आहोत किंवा विवाहित आहोत, ही माहिती ज्यामुळे मिळेल, त्या व्यक्तीला, कारणांना असले नराधम मुली-महिलापर्यंत पोहोचूच देत नाही. मुलीच्या भावनांचा अभ्यास करून, तो तिला ताब्यात घेतो. तो सांगतो की, सगळ्यांशी संपर्क तोड; आपल्या नात्याबद्दल कुणालाच सांगू नकोस. "तुम्हारे लिए जान हाजीर हैं,” वगैरे फिल्मी डायलॉग हेच सत्य आहेत, हे मानून मुली त्याचे म्हणणे ऐकतात. ऐकले नाही, तर तो नराधम तिला भावनिकदृष्ट्या ‘ब्लॅकमेल’ करतो. या काळात तिचे शारीरिक शोषणही सुरूच असते. तीही त्यात वाहवत गेलेली असते. दुसरीकडे समाजाची उदासीनता. उल्हासनगरच्या घटनेत महाविद्यालयातला कर्मचारी तौसिफ आणि या मुलीची जवळीक कुणालाच लक्षात आली नाही का? महाविद्यालयातील कर्मचारी, शिक्षक किंवा व्यवस्थापनाला याबाबत काही माहिती नव्हती? पण, कुणीही काहीही केले, तरी सामाजिक जबाबदारी झटकून लोक म्हणतात, "तो त्यांचा खासगी विषय आहे.” या प्रकरणालाही ‘खासगी’च म्हटले गेले असेल. दुसरीकडे तौसिफने त्या मुलीला धमकी दिली होती की, तो त्याची पत्नी, चार मुले आणि त्याच्या ‘कौम’च्या मित्रांना एकत्र करून त्या मुलीच्या घरी येईल. याचाच अर्थ, त्याच्या कुकृत्याला अनैतिक वागण्याला गुन्हेगारीलाही त्याच्या लोकांनी साथ दिली. उल्हासनगर ‘सकल हिंदू समाजा’चे धन्यवाद की त्यांनी पीडित मुलीला न्याय देण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ करणार्‍यावर कारवाई होण्यासाठी लढा दिला!
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.