मुंबई : (Delhi Police) दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान, नेपाळ आणि बांग्लादेशाशी जोडलेले हे संपूर्ण तस्करीचे रॅकेट दिल्लीच्या वॉल्ड सिटी परिसरातून चालवले जात होते.(Delhi Police)
२१ परदेशी शस्त्रास्त्रं जप्त
कारवाईत एकूण २१ उच्च दर्जाची परदेशी बनावटीची शस्त्रास्त्रं जप्त करण्यात आली. यात सबमशीन गन्स, PX-5.7 पिस्तूल, PX-3 पिस्तूल, शॅडो CZ पिस्तूल, बेरेट्टा पिस्तूल, टॉरस पिस्तूल, वॉल्थर पिस्तूल यांचा समावेश आहे. विशेष दलांकडून वापरल्या जाणाऱ्या PX-5.7 पिस्तूलसुद्धा यात आहे. तसेच २०० जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.(Delhi Police)
The Crime Branch has successfully busted a major international arms trafficking module linked to Pakistan, Nepal, and Bangladesh, which was being operated from the Walled City in Delhi. In this operation, 10 key operatives of the interstate arms trafficking module were arrested.… https://t.co/al6UcBzHs6pic.twitter.com/Fm7IER8sKe
पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशातील तस्करांशी संबंध
प्राथमिक चौकशीतून उघड झाले आहे की, ही शस्त्रे पाकिस्तानातून भारत-नेपाळ सीमेच्या मार्गे देशात आणली जात होती आणि दिल्ली-एनसीआरसह इतर राज्यांतील गुन्हेगारी टोळ्यांना पुरवली जात होती. दिल्ली पोलिसांच्या मते, या रॅकेटचा विस्तार मोठा असण्याची शक्यता असल्याने यामागील आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या शस्त्रांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे.(Delhi Police)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\