PM Modi Donald Trump Call : पंतप्रधान मोदी - ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा! नेमकं काय बोलणं झालं?

    24-Mar-2026   
Total Views |


PM Modi Donald Trump Call
 
मुंबई : (PM Modi Donald Trump Call) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी २४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पश्चिम आशियातील इराण विरुद्ध इस्त्रायल-अमेरिका युद्धासंदर्भात ही चर्चा झाली. जागतिक व्यापारासाठी महत्त्वाची असलेली 'होर्मुझची सामुद्रधुनी' खुली राहणे किती आवश्यक आहे, यावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. भारताचा भर शांतता आणि संवादावर असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.(PM Modi Donald Trump Call)
 
मोदी-ट्रम्प यांच्यात काय बोलणं झालं?
 
पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आला आणि पश्चिम आशियातील परिस्थितीवर त्यांच्याशी उपयुक्त चर्चा झाली. परिस्थिती शांत करण्यासाठी आणि शक्य तितक्या लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली, सुरक्षित आणि सर्वांसाठी उपलब्ध राहणे हे संपूर्ण जगासाठी अत्यावश्यक आहे. शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या दिशेने पुढील पावले उचलण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांबद्दल आम्ही संपर्कात राहू, असेही मोदी म्हणाले.(PM Modi Donald Trump Call)

पंतप्रधानांचे राज्यसभेतून शांततेचे आवाहन

पश्चिम आशियामध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जगावर इंधन टंचाईचे संकट ओढवले आहे.भारतही या परिस्थितीपासून अलिप्त नसून, अशा आव्हानात्मक काळात संयम, दृढनिश्चय आणि एकजूट आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना स्पष्ट केले. पश्चिम आशियातील परिस्थितीवर भारताची भूमिका मांडत त्यांनी देशातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले.(PM Modi Donald Trump Call)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\