मुंबई: (Rahul Narwekar) सातारा जिल्हा परिषद निवडणूकीदरम्यान, झालेल्या गोंधळावरून सोमवारी शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक होत विधानसभेत गदारोळ केला. यावेळी विधानसभा अध्यक्षांकडे पाठ करून उभे राहिल्याने त्यांनी आमदारांवर नाराजी व्यक्त केली. (Rahul Narwekar)
सातारा जिल्हा परिषद निवडणूकीदरम्यान मंत्री शंभुराजे देसाई यांना पोलिसांनी पकडून फरफटत नेल्याचा आरोप त्यांनी विधानसभेत केला. तसेच संबंधित पोलिस अधिक्षकांना यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतरही शिवसेनेच्या आमदारांनी सभागृहात गदारोळ केल्याचे पाहायला मिळाले. (Rahul Narwekar)
शिवसेनेचे बहुतांश आमदार वेलमेल उतरले आणि अध्यक्षांसमोरील टेबलावर थापा देत जोरजोरात वाजवू लागले. बराच वेळ हा गदारोळ चालल्यानंतर हे सगळे आमदार माघारी फिरले आणि अध्यक्षांच्या आसनाकडे पाठ दाखवून बोलत उभे राहिले. यावरून विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आ. विजय शिवतारे यांचा उल्लेख करत अध्यक्ष म्हणाले, “तुम्ही मंत्री राहिले आहात. माझ्याकडे पाठ करून उभे आहात. हे योग्य आहे का?” या सगळ्या घडामोडीनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदारांना जागेवर बसण्याची विनंती केली. (Rahul Narwekar)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....