Ram Controversy: पश्चिम बंगालमध्ये ‘राम’वरून राजकीय रणधुमाळी!

    23-Mar-2026   
Total Views |
 
Ram Controversy
 
मुंबई : (Ram Controversy) पश्चिम बंगामध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. एका बाजूला तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेत्याचे भगवान श्रीरामांबाबतचे वादग्रस्त विधान, तर दुसरीकडे रामनवमीसाठी तयार होत असलेल्या मूर्तीची विटंबना या दोन घटनांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. (Ram Controversy)
 
टीएमसीचे नेते चंद्रनाथ सिन्हा यांनी प्रचारसभेदरम्यान 'भगवान राम हे उत्तर भारतातील देव आहेत, असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या घोषणांवर भाष्य करत, बंगालमध्ये ‘जय श्रीराम’ चालत नाही, असा दावा केल्याने वाद अधिकच चिघळला. सिन्हा यांच्या या वक्तव्यावर भाजपाने कडक टीका केली आहे. (Ram Controversy)
 
दरम्यान, नंदीग्राममधील वेटुरिया बसस्थानक परिसरात रामनवमीसाठी तयार होत असलेल्या भगवान रामांच्या मूर्तीची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. मूर्तीचे डोके तोडून नेल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. स्थानिक नागरिकांनी याला हिंदू आस्थेवरचा हल्ला असल्याचे म्हटलेय. नंदीग्रामचे आमदार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी या घटनेचा निषेध करत राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर ‘तुष्टीकरणाची राजकारण’ आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आरोप केला. (Ram Controversy)
 
नंदीग्राम हा आधीपासूनच राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघ मानला जातो. २०२१ च्या निवडणुकीत येथे टीएमसी आणि भाजपा यांच्यात थेट लढत झाली होती. आता पुन्हा निवडणुका जवळ आल्याने अशा घटनांमुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. स्थानिकांकडून प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप होत आहेत. (Ram Controversy)
 
एकूणच, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक भावना आणि राजकीय वक्तव्ये यांचा संगम होत असल्याचे दिसून येत असून, त्यामुळे राज्यातील वातावरण अधिक संवेदनशील बनत आहे. (Ram Controversy)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक