Ajmer: भजनसंध्या कार्यक्रमात गायली कव्वाली!

    23-Mar-2026   
Total Views |
 
Ajmer
 
मुंबई : (Ajmer) राजस्थानच्या अजमेर येथे एका भजन कार्यक्रमादरम्यान गायकाने कव्वाली सादर केल्यामुळे वाद निर्माण झाला. कार्यक्रमस्थळी उपस्थित बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांनी या सादरीकरणाला विरोध केला, ज्यामुळे गायकाला मंच सोडून जावे लागले. आंदोलनकर्त्यांनी गायकाकडून माफीची मागणी केली असून, अशा घटनांमुळे शहरातील सामाजिक सलोखा बिघडू शकतो, असा दावा त्यांनी केला. (Ajmer)
 
याप्रकरणी एक व्हिडिओ समोर आला असून समाज माध्यमांवर प्रचंड प्रमाणात तो व्हायरल होतोय. आयोजित भजन कार्यक्रमात काही गायकांना भजन सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, कार्यक्रमादरम्यान एका गायकाने ख्वाजा गरीब नवाज यांना समर्पित कव्वाली सादर केल्याने वाद निर्माण झाला. रविवारी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी यावर तीव्र आक्षेप घेत निदर्शने केली, ज्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. (Ajmer)
 
हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी असा आरोप केला की, धार्मिक भजन कार्यक्रमात अशा प्रकारचे सादरीकरण करणे अयोग्य असून त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातात. (Ajmer)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक