Ashwini Vaishnaw : “रेल्वे राजकारणाचा विषय नाही; प्रकल्पांसाठी राज्यांनी सहकार्य करावे”

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे सभागृहात उत्तर

Total Views |
Ashwini Vaishnaw
 
नवी दिल्ली : (Ashwini Vaishnaw) "रेल्वे हा राजकारणाचा विषय नसून सामान्य नागरिकांना सेवा जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. देशातील प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक राज्य सरकारने रेल्वे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी सक्रिय सहकार्य करणे ही त्यांची जबाबदारी आहे ", असे स्पष्ट शब्दांत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी लोकसभेत सर्व राज्यांना सुनावले.
 
प्रादेशिक पातळीवर होणाऱ्या विलंबाबाबतच्या प्रश्नांना उत्तर देताना वैष्णव म्हणाले की, रेल्वेच्या प्रगतीसाठी राजकीय भेद नव्हे तर वस्तुनिष्ठ सहकार्य आवश्यक आहे. अनेक विरोधी पक्षांच्या राज्यांनी जमीन अधिग्रहण प्रक्रियेत उत्तम सहकार्य केले असून ज्या ठिकाणी राज्य सरकारांचा पाठिंबा आहे, तेथे प्रकल्प सुरळीतपणे पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे या विषयाला राजकारणाचा रंग देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी (Ashwini Vaishnaw) स्पष्ट केले.
 
सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या सुधारणांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, वंदे भारत ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. पारंपरिक कपलिंगऐवजी सेमी-परमनंट कपलर्सचा वापर केल्यामुळे संपूर्ण ट्रेन एकसंध युनिट बनते, ज्यामुळे सुरक्षिततेत मोठी वाढ झाली आहे. तसेच ‘अँटी-क्लायंबिंग’ तंत्रज्ञानामुळे अपघाताच्या वेळी एक डबा दुसऱ्यावर चढण्याची शक्यता कमी होते, हेही त्यांनी स्पष्ट केले.(Ashwini Vaishnaw)
 
हेही वाचा : Bhavya Scheme: भारताच्या औद्योगिक प्रगतीला मोठी चालना; ‘भाव्य’ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी 
 
केरळमधील रेल्वे नेटवर्कबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, उत्तर-दक्षिण मार्गावरील क्षमता वाढवणे हा मुख्य उपाय आहे. कासरगोड ते शोरनुर, एर्नाकुलम, कायमकुलम, तिरुवनंतपुरम तसेच पलक्कड-कोयंबतूर या मार्गांवरील प्रकल्प सध्या डीपीआर टप्प्यात आहेत. सुरुवातीला आठ डब्यांपासून सेवा सुरू करून मागणीनुसार ती १६ किंवा २० डब्यांपर्यंत वाढवली जाते, असेही त्यांनी सांगितले.(Ashwini Vaishnaw)
 
वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करणाऱ्या घटनांवर नियंत्रणासाठी तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, ऑनबोर्ड कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्ताच्या मदतीने आरोपींना ओळखून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात यश मिळत आहे. अगदी छोट्या प्रतिमेच्या आधारेही संबंधित व्यक्तीचा शोध घेणे शक्य झाले असल्याचे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले.(Ashwini Vaishnaw)
 
शेवटी, वंदे भारत ट्रेनला लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे मान्य केल्याबद्दल विरोधकांचे त्यांनी आभार मानले आणि देशाच्या प्रगतीसाठी असा सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.(Ashwini Vaishnaw)
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.