Mumbai Metro Project: मेट्रो स्थानक परिसराचा खर्च महापालिका का करणार?

    19-Mar-2026
Total Views |
 
Mumbai Metro Project
 
मुंबई: (Mumbai Metro Project) कुलाबा–सिप्झ मेट्रो मार्गावरील २७ स्थानकांच्या परिसर विकासासाठी महापालिकेवर टाकलेल्या जबाबदारीवरून स्थायी समितीत वाद रंगला. हा खर्च मेट्रो प्रशासनाने करावा, अशी मागणी स्थायी समितीत अनेक नगरसेवकांनी केली. (Mumbai Metro Project)
 
कुलाबा ते सिप्झ मेट्रो मार्गावरील २७ स्थानकांच्या ५०० मीटर परिसरात सुधारणा करण्याची जबाबदारी राज्य सरकारने मुंबई महापालिकेला दिली आहे. या २७ स्थानकांवर काम प्रस्तावित असून दहा कोटी ५७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र मेट्रो स्थानक परिसराचा कायापालट करण्यासाठी महापालिकेने खर्च का करावा, असा सवाल उपस्थित करत काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) गटाने प्रस्तावाला विरोध केला. मेट्रो प्रशासन म्हणजेच एमएमआरसीएलनेच हा खर्च करावा, अशी मागणी करण्यात आली. (Mumbai Metro Project)
 
अश्रफ आजमी यांनी या प्रकल्पाला विरोध केला तसेच नागरिकांना मेट्रोच्या कामामुळे असलेल्या अडचणी समोर आणल्या. (Mumbai Metro Project)
 
चर्चेदरम्यान सदस्यांनी मेट्रो प्रकल्पामुळे रस्ते, मलनिस्सारण व्यवस्था आणि मैदाने यांचे नुकसान झाले अशी टीका यावेळी शिवसेना बाळा साहेब ठाकरे गटाचे यशोधर फणसे यांनी केली. (Mumbai Metro Project)
 
तर हा खर्च महापालिकेच्या माथी मारणे योग्य नसल्याचे सांगत संपूर्ण मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर अहवाल सभागृहासमोर मांडावा, अशीही मागणी यामिनी जाधव यांनी केली. तर काँग्रेसच्या ट्युलिप मिरांडा यांनी प्रकल्प सुरू होण्यापूर्वी प्रोजेक्ट रिपोर्ट जाहीर करणे आवश्यक होते मात्र प्रकल्प पूर्ण झाल्यावर आशा गोष्टी समोर येणे म्हणजे सभागृहाची फसवणूक आहे असे त्या म्हणाल्या. (Mumbai Metro Project)
 
दुसरीकडे, सभागृहनेते गणेश खनकर यांनी मेट्रो प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करत त्याचे समर्थन केले. मात्र यावर आम्ही मेट्रोला नाही तर मेट्रोच्या शेजारील ५०० मीटरवर महापालिका करत असलेल्या खर्चला विरोध करत असल्याचे आश्रफ आजमी यांनी जाहिर केले. मात्र विरोध कायम राहिल्याने स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव राखून ठेवला. (Mumbai Metro Project)