Uday Samant: मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा: उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत
19-Mar-2026
Total Views |
मुंबई: (Uday Samant) बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेने सर्वसमावेशक आरोग्य सुविधांचा आराखडा तयार करण्याबाबत महापालिकेस निर्देश दिले जातील असे उद्योग मंत्री डॉ. उदय सावंत यांनी विधान परिषदेत सांगितले. (Uday Samant)
सदस्य राजहंस सिंह यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना ते बोलत होते. (Uday Samant)
मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले की, महानगरपालिकेकडे प्राथमिक केंद्रे, उपनगर रुग्णालये तसेच केईएम., नायर, सायन व कूपर ही प्रमुख रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. आरोग्यासाठी नायरसह चारही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नवीन एमआरआय यंत्रणा पुढील काही महिन्यांत बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Uday Samant)
सदस्यांनी मांडलेल्या सूचनांनुसार लहान रुग्णालयांमध्ये आयसीयू व प्राथमिक सुविधा वाढवून मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे तसेच कोविडकालीन यंत्रसामग्रीचा पुनर्वापर करण्याबाबतही सकारात्मक पावले उचलली जाणार असल्याचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले. (Uday Samant)
सदस्य सचिन अहिर, प्रसाद लाड व चित्रा वाघ यांनी चर्चेत सहभाग घेतला. (Uday Samant)