Sustainable Development: 'महाराष्ट्र भविष्य कल्याण' विधेयकासाठी समिती स्थापन करण्याचे राज्य सरकारचे आश्वासन

    19-Mar-2026   
Total Views |
 
Sustainable Development
 
मुंबई : (Sustainable Development) राज्य सरकारने 'महाराष्ट्र भविष्य कल्याण' संकल्पनेवर आधारित विधेयकाच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेत विधेयकासाठी विशेष समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. भाजप आ. अमीत साटम यांनी मांडलेल्या अशासकीय विधेयकाच्या अनुषंगाने हे आश्वासन देण्यात आले. (Sustainable Development)
 
संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील या विधेयकावर बोलताना म्हणाले की, "प्रस्तावित समिती या संकल्पनेचा सर्वंकष अभ्यास करेल. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या अधिवेशनातच त्या समितीची घोषणा केली जाईल." उबाठा गटाचे आ. आदित्य ठाकरे यांनीही या विधेयकाला पाठिंबा दिला. (Sustainable Development)
 
महाराष्ट्र भविष्य कल्याण विधेयक काय आहे? (Sustainable Development)
 
आ. अमीत साटम यांनी मांडलेले महाराष्ट्र भविष्य कल्याण विधेयक हे शाश्वत भविष्य घडवण्यावर आधारित असून, ते युनायटेड नेशन्सच्या १७ शाश्वत विकास उद्दिष्टांशी (SDGs) सुसंगत आहे. या माध्यमातून पुढील पिढ्यांच्या सर्वांगीण कल्याणाचा विचार शासनाच्या निर्णयप्रक्रियेत समाविष्ट करण्याचा उद्देश आहे. हे विधेयक युके मधील वेल्स सरकारच्या वेल-बीइंग ऑफ फ्यूचर जनरेशन ॲक्ट २०१५ वर आधारित आहे. (Sustainable Development)
 
आ. अमीत साटम म्हणाले की, "विविध सरकारी विभागांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी फ्युचर जनरेशन आयुक्तालय स्थापन केले पाहिजे. यामुळे कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार आले तरी प्रत्येक विभागाला या ठरवून दिलेल्या उद्धिष्टांच्या आणि मापदंडांच्या अनुषंगाने काम करून शाश्वत विकासाचे ध्येय गाठता येईल. यामुळे सुखी, समृद्ध, समाधानी आणि सुरक्षित महाराष्ट्र निर्माण होण्यास होईल." (Sustainable Development)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....