नवी दिल्ली: (Bhavya Scheme) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवार, दि. १८ मार्च,2026 देशभरात औद्योगिक विकासाला गती देणाऱ्या ‘भारत औद्योगिक विकास योजना’ ला मंजुरी दिली. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी तब्बल ३३,६६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, देशभरात १०० ‘प्लग-अँड-प्ले’ औद्योगिक पार्क उभारण्याचा उद्देश आहे. (Bhavya Scheme)
अधिकृत निवेदनानुसार, या योजनेद्वारे जागतिक दर्जाची औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण करून भारताच्या उत्पादन क्षेत्राची क्षमता वाढविणे आणि देशाच्या आर्थिक विकासाला गती देणे अपेक्षित आहे. ‘भाव्य’ योजना राज्य सरकार आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्याने राबवली जाणार असून, ती ‘नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत विकसित झालेल्या औद्योगिक परिसंस्थेवर आधारित असेल. (Bhavya Scheme)
या योजनेचा मुख्य भर ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ सुधारण्यावर असून, मंजुरी प्रक्रियेचे सुलभीकरण, प्रभावी सिंगल-विंडो प्रणाली आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरणात्मक सुधारणा यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. ‘प्लग-अँड-प्ले’ संकल्पनेमुळे उद्योगांना जलद आणि निश्चितपणे उत्पादन सुरू करता येईल. पूर्व-मंजूर जमीन, तयार पायाभूत सुविधा आणि एकात्मिक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने गुंतवणूकदारांसाठी प्रवेशातील अडथळे मोठ्या प्रमाणात कमी होतील. (Bhavya Scheme)
या अंतर्गत विकसित होणारे औद्योगिक पार्क १०० ते १००० एकर क्षेत्रफळाचे असतील. तसेच, कोर पायाभूत सुविधा, तयार कारखाना शेड्स, टेस्टिंग लॅब्स आणि कामगारांसाठी निवास व्यवस्था यांसारख्या सुविधांसाठी प्रति एकर १ कोटी रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. ही योजना भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. (Bhavya Scheme)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.