मुंबई : (Iftar Party at Panchganga Ghat) धर्मनगरी काशीमध्ये गंगा नदीच्या मधोमध बोटीवर इफ्तार पार्टी केल्याच्या घटनेने वातावरण तापले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सक्रिय झालेल्या पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणात १४ युवकांना अटक केली. ही घटना पंचगंगा घाटाजवळील असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी संध्याकाळी काही युवक बोटीवर इफ्तार पार्टी करताना दिसले. यावेळी मांसाहारी जेवण करत जेवणानंतर हाडे गंगा नदीत फेकण्यात आल्याचा आरोप आहे. (Iftar Party at Panchganga Ghat)
भारतीय जनता युवा मोर्चाचे महानगराध्यक्ष रजत जायसवाल यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी याला आस्थेचा अपमान म्हटले असून, “मां गंगेचे आचमन आणि दर्शन-पूजन करण्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक काशीला येतात. अशा पवित्र नदीत अशा प्रकारचे कृत्य करणे म्हणजे हिंदू धर्माच्या श्रद्धेवर गंभीर आघात आहे,” असे ते म्हणाले. (Iftar Party at Panchganga Ghat)
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन डीसीपी (काशी झोन) गौरव बंसवाल यांनी सांगितले की, व्हिडिओची तत्काळ चौकशी करून आरोपींची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी जलद कारवाई करत १४ युवकांना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. (Iftar Party at Panchganga Ghat)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक