सुनेत्रा पवार यांनी घेतले छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन
18-Mar-2026
Total Views |
मुंबई : (Sunetra Pawar) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी-३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त त्यांच्या श्री क्षेत्र वढू बु. येथील समाधीस्थळी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दर्शन घेतले.
श्री क्षेत्र तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळी जावून उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी अभिवादन केले तसेच पुण्यतिथीनिमित्त येथे आयोजित मुकज्योत पदयात्रेत गावकऱ्यांसोबत त्या सहभागी झाल्या.