मुंबई : (Iran Security Chief Ali Larijani killed) पश्चिम आशियातील युद्धाला १९ दिवस पूर्ण झाले असून परिस्थिती अधिकच तणावाची बनली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याऐवजी लष्करी मोहीम सुरूच ठेवण्याचे संकेत दिले आहेत. यातच इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांचा इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याची इराणकडून कबुली देण्यात आली आहे. लारीजानी हे आपल्या मुलीच्या घरी होते. तेव्हा त्यांच्यावर हवाई हल्ला झाला आहे. लारीजानी यांचा मुलगाही यात ठार झाला आहे.(Iran Security Chief Ali Larijani killed)
मुलीच्या घरी असताना हल्ला
माहितीनुसार, हल्ल्याच्या वेळी लारीजानी यांच्या मुली घराच्या दुसऱ्या भागात होत्या, ज्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या. मात्र, आपल्या डोळ्यादेखत वडील आणि भावाचा मृत्यू झाल्याने त्या मोठा धक्क्यामध्ये आहेत. अली लारीजानी यांचा मुलगा वडिलांसोबतच महत्त्वाच्या चर्चेत होता, त्यावेळी झालेल्या स्फोटात त्याचाही मृत्यू झाला. इस्रायलने हा हल्ला इतक्या अचूकपणे केला की, केवळ लारीजानी यांचे सुरक्षित ठिकाण उद्ध्वस्त झाले, ज्यामुळे आजूबाजूच्या नागरी वस्तीचे नुकसान टाळले गेले, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.(Iran Security Chief Ali Larijani killed)
जनरल गुलाम रझा सोलेमनी यांचाही मृत्यू
माहितीनुसार, इस्रायलने मंगळवारी रात्री केलेल्या हवाई हल्ल्यात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. सुरुवातीला हा दावा फेटाळल्यानंतर आता इराणने लारिजानी यांच्यासह जनरल गुलाम रझा सोलेमनी यांचाही मृत्यू झाल्याच्या वृत्ताला इराणने दुजोरा दिला आहे. जनरल गुलाम रझा अतिशय शक्तिशाली लष्करी अधिकारी म्हणून ओळखले जात होते, गेल्या सहा वर्षापासून ते रिव्होल्यूशनरी गार्डचे बसिज गटाचे कमांडर होते. देश युद्धाच्या संकटात अराताना अयातुल्ला यांच्या मृत्यूनंतर इराणसाठी हा दुसरा सर्वात मोठा झटका मानला जात आहे. इस्रायलने दोन सुरक्षा अधिकाऱ्यांना ठार केल्यानंतर नवनियुक्त सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी यांना शोधून ठार करणार, अशी धमकी दिली आहे.(Iran Security Chief Ali Larijani killed)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\