नवी दिल्ली : (India 6G) केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केले की, भारत 6G मोबाईल नेटवर्कसाठी जागतिक मानकं विकसित करण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित 6G मानकीकरणावरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.(India 6G)
डेटा लेटन्सी जवळपास शून्य
मंत्री सिंधिया म्हणाले, “6G मानके निश्चित करण्यात भारताचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी विशेष कार्यगट तयार करण्यात आले आहेत. 6G हे अमर्याद क्षमतेचे तंत्रज्ञान असून ते डिजिटल दरी कमी करत जगातील प्रत्येक नागरिकासाठी नवी संधी निर्माण करेल.” 6G युगाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, "6G तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा वेग अनेक पटींनी वाढणार असून ‘लेटन्सी’ म्हणजेच डेटा पोहोचण्यासाठी लागणारा विलंब जवळपास पूर्णपणे नाहिसा होणार आहे. हे तंत्रज्ञान दूरसंचार क्षेत्रातीलच नव्हे तर मानवी क्षमतांच्या विस्तारातील मोठी झेप असल्याचे त्यांनी सांगितले.(India 6G)
Hon’ble Minister Shri @JM_Scindia ji participates in the International Workshop on 6G Standardisation.
— Office Of JM Scindia (@Officejmscindia) March 18, 2026
गेल्या १० वर्षांत डेटाचे दर ९७ टक्क्यांनी कमी झाले आहेत आणि भारतात दर महिन्याला २० अब्जांहून अधिक डिजिटल व्यवहार होत आहेत. डिजिटल क्षेत्रात जगात भारत आघाडीवर असल्याचे म्हणत भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील प्रगतीविषयी भाष्य केले. तसेच या कार्यशाळेमुळे दूरसंचार क्षेत्रात शाश्वत आणि ठोस परिणाम साधले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(India 6G)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\