Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याने सभागृहात गदरोळ; निलंबनाची मागणी

    17-Mar-2026   
Total Views |
 
Jitendra Awhad
 
मुंबई : (Jitendra Awhad) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकासंदर्भात आ. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सोमवारी विधानसभा सभागृहात एकच गदारोळ उडाला. यामुळे सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. (Jitendra Awhad)
 
'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६' यावर चर्चा सुरु असताना या विधेयकावर बोलताना शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाबाबत केलेल्या उल्लेखावरून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला. यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ उडाला आणि दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. (Jitendra Awhad)
 
आव्हाडांची दिलगिरी (Jitendra Awhad)
 
मात्र, त्यानंतरही हा गदारोळ सुरुच होता. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याचे आदेश देत त्यांचे वक्तव्य रेकॉर्डवरून काढून टाकणार असल्याचे सांगितले. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. (Jitendra Awhad)
 
‘ही’ शेवटची संधी (Jitendra Awhad)
 
मात्र, सत्ताधारी आमदारांकडून जितेंद्र आव्हाड यांच्या निलंबनाची मागणी करत ‘जय शिवराय’च्या घोषणा देण्यात आल्या. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना सांगितले की, “यापुढे जर छत्रपती शिवाजी महाराज किंवा राज्यातील महापुरुषांबद्दल चुकीचे विधान केले तर, नियम ५३ अंतर्गत तुम्हाला निलंबित करावे लागेल.” (Jitendra Awhad)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....