आमदार विलास तरे यांनी विधानसभेत सीडी देत अंमली पदार्थ विक्रीचा केला भांडाफोड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश

    17-Mar-2026
Total Views |
Drug Sales in Vasai-Virar
 
मुंबई : (Drug Sales in Vasai-Virar) वसई विरार शहर हद्दीत मोठ्या प्रमाणावर दिवसाढवळ्या खुलेआम अंमली पदार्थांची विक्री होत असल्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाश्वभूमीवर विधानसभेत तारांकित प्रश्न आमदार विलास तरे यांनी उपस्थित केला आहे.
 
यावेळी बोलताना आमदार विलास तरे म्हणाले की," वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थावर कारवाई झालेली आहे. ३० ठिकाणी धाडी आणि कारवाई झालेली आहे. माझ्या मतदारसंघांमध्ये पेल्हार पोलीस स्टेशन अंतर्गत बाजूला हाकेच्या अंतरावर ११ कोटीचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केलेला आहे. मी मंत्र्यांना पत्र दिलं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने ही कारवाई झालेली होती."
 
हेही वाचा : ड्रग्स तस्करांची ‘फॉरवर्ड’ आणि ‘बॅकवर्ड’ लिंक शोधून काढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
" पेल्हार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आणि याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भात मी मंत्र्यांना सीडी देणार आहे. ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे अंमली पदार्थ जिथे विक्री होते त्या पीआय वर आपण कारवाई करणार का? आणि पेल्हार पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे जे पानटपरी असतील किंवा छोटी किराणा दुकाने असतील इथे हप्ते घेऊन त्यांना प्राधान्य दिले जाते याची चौकशी करून कठोर कारवाई करणार का ? असे माझे प्रश्न होते."
 
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की, "आमदार विलास तरे यांनी जी माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती खरी मानून त्यांनी पत्र दिल्यानंतर कारवाई झाली नसेल आणि मुंबई पोलिसांनी त्याच ठिकाणी कारवाई केली असेल तर याची चौकशी केली जाईल आणि याकरिता जो कोणी जबाबदार अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि त्यांनी सीडीच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे त्या माहितीची चौकशी तात्काळ करण्याचे आदेश देण्यात येतील."