Subhas Chandra Bose: नेताजी सुभाषचंद्र बोस यांची टोपी लाल किल्ल्यावर सुरक्षित: पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे स्पष्टीकरण

नेताजींचे नातू चंद्रकुमार बोस यांनी केला होता गहाळ झाल्याचा आरोप

    14-Mar-2026
Total Views |
Subhas Chandra BoseSubhas Chandra Bose 
मुंबई : (Subhas Chandra Bose) नेताजी सुभाषचंद्र बोस यांची टोपी लाल किल्ल्यावरील संग्रहालयातून गहाळ झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनी दि. 12 मार्च रोजी ही टोपी किल्ल्यावर नसल्याने, गहाळ झाल्याचे समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे म्हटले होते. मात्र, पुरातत्व सर्वेक्षण विभागाने पुढे येत नेताजींची टोपी सुरक्षित असून, श्री विजय पुरम येथील एका प्रदर्शनामध्ये ती टोपी ठेवल्याचे स्पष्ट केले आहे. (Subhas Chandra Bose)
 
नेताजींचे नातू चंद्रकुमार बोस यांनी दि. 12 मार्च समाजमाध्यमांवरील संदेशात पंतप्रधान मोदी यांना उद्देशून म्हटले होते की, मी, माझ्या घरच्या सदस्य आणि मित्रांनी मिळून तुमच्याकडे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची टोपी सोपवली होती. तसेच, दि. 23 जानेवारी 2019 या दिवशी नेताजींच्या जयंतीचे अवचित्य साधत तुम्ही ती टोपी लाल किल्ल्यावर ठेवली होती. मात्र, अलीकडे नेताजी ओपन प्लॅटफॉर्मचे सदस्य नवीन बामेल यांनी दिलेल्या संग्रहालय भेटीदरम्यान ती टोपी त्यांनी लाल किल्ल्यावर आढळून आलेली नाही. नेताजी खुप मोठे नेते होते आणि ही घटनादेखील वेदनादायी असल्याचेही चंद्रकुमार यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटले होते. त्याचप्रमाणे त्यांनी त्याच संदेशाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांना लक्ष घालण्याची सूचना केली आहे. (Subhas Chandra Bose)
 
यावर पुरातत्व सर्वेक्षण विभागाने स्पष्टीकरण देताना ही टोपी सुरक्षित असून, दि 19 ते 25 जानेवारी या काळामध्ये पराक्रम दिनाच्या निमित्ताने श्री विजय पुरम येथे ती प्रदर्शनासाठी नेण्यात आल्याचे पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने म्हटले आहे. त्याचप्रमाणे प्रदर्शनानंतर ही मूळ टोपी तिच्या मूळ जागी म्हणजेच, लाल किल्यावर परत आल्याचेही म्हटले आहे. (Subhas Chandra Bose)
 
मोदी सरकारने जपल्या नेताजींच्या स्मृती... (Subhas Chandra Bose)
 
- दिल्ली येथील इंडिया गेट येथे उभारला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा 28 फुटी पुतळा
 
- 2021 पासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी
 
- आझाद हिंद सरकारच्या 75व्या वर्षानिमित्त लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला
 
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी निगडीत गुप्त माहिती सार्वजनिक करण्यात आली
 
- 2018 मध्ये रॉस बेटाचे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस बेट असे करण्यात आले