मुंबई : (USS Abraham Lincoln) इराणने अमेरिकेच्या 'यूएसएस अब्राहम लिंकन' या विमानवाहू युद्धनौकेवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केल्याचा खळबळजनक दावा केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या नौदलाने लिंकनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला करुन, युद्धनौकेला माघार घेण्यास भाग पाडले, असे वृत्त इराणच्या प्रेस टीव्हीने प्रसारित केले आहे. पण, मात्र पँटागॉन आणि अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) हा दावा फेटाळला असून, युद्धनौका सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.(USS Abraham Lincoln)
इराणने काय म्हटलंय?
इराणच्या पैगंबर केंद्रीय मुख्यालयाने याबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. "ओमान समुद्रात असणाऱ्या अब्राहम लिंकन युद्धनौकेवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या मदतीने अचूक हल्ला करण्यात आला. ही युद्धनौका इराणच्या सागरी सीमेपासून सुमारे ३४० किलोमीटर अंतरावर होती", असे मुख्यालयाने म्हटले आहे. हल्ला झाल्यानंतर युद्धनौकेने माघार घेतली असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. पण, इराणने हल्ल्याच्या दाव्याला सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा सादर केलेला नाही.(USS Abraham Lincoln)
अमेरिकेने फेटाळला दावा
अब्राहम लिंकन युद्धनौकेवर हल्ला केल्याचा इराणने दावा केल्यानंतर अमेरिकेने लगेचच याला उत्तर देत दावा खोटा असल्याचे सांगितले. पँटागॉन आणि अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने युद्धनौकेचा फोटो प्रसिद्ध करत ती सुरक्षित असल्याचे सांगितले. नौका ऑपरेशन एपिक फ्युरीमध्ये महत्वाची भूमिका बजावत असल्याचेही अमेरिकेने नमूद केले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\