Deputy Chief Minister Medical Assistance Cell : उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाद्वारे कशी मिळवावी वैद्यकीय मदत? संपूर्ण माहिती

    27-Feb-2026   
Total Views |
Deputy Chief Minister Medical Assistance Cell

मुंबई: (Deputy Chief Minister Medical Assistance Cell) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी विविध शासकीय व धर्मादाय योजनांद्वारे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देत आहे. कर्करोग, हृदय शस्त्रक्रिया, प्रत्यारोपण, डायलिसिस, अपघात प्रकरणे अशा गंभीर उपचारांसाठी खालील ५ प्रमुख योजनांद्वारे मदत दिली जाते.
 
१) मुख्यमंत्री सहायता निधी (CMRF)
 
मदत मिळणारे आजार:
  • कर्करोग
  • हृदय शस्त्रक्रिया
  • किडनी/यकृत प्रत्यारोपण
  • डायलिसिस
  • मेंदू विकार
  • नवजात शिशूंचे गंभीर आजार
  • अपघातग्रस्त रुग्ण
पात्रता:
  • वार्षिक उत्पन्न ₹१.५० लाखांपर्यंत
  • रुग्ण महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक
आवश्यक कागदपत्रे:
  • अर्ज नमुना
  • तहसीलदार उत्पन्न दाखला
  • आधार कार्ड
  • रहिवासी पुरावा
  • वैद्यकीय अहवाल
  • रुग्णालय अंदाजपत्रक
  • FIR (अपघात प्रकरणात)
  • शासन समिती मान्यता (प्रत्यारोपण प्रकरणात)
अर्ज प्रक्रिया:
  • सर्व कागदपत्रांची PDF तयार करून ई-मेलवर पाठवणे
  • ई-मेल: [email protected]
  • अधिकृत संकेतस्थळ: cmrf.maharashtra.gov.in
     
२) पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF)
 
पात्रता:
  • वार्षिक उत्पन्न ₹१ लाखांपर्यंत
  • खासदार शिफारसपत्र आवश्यक
आवश्यक कागदपत्रे:
  • तहसीलदार उत्पन्न दाखला
  • ₹१० स्टॅम्प पेपरवरील नोटरी शपथपत्र
  • आधार कार्ड व मतदार ओळखपत्र
  • PMNRF अर्ज नमुना
  • दोन पासपोर्ट फोटो
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • रुग्णालय अंदाजपत्रक
अर्ज सादरीकरण: 
  • दिल्ली येथे प्रत्यक्ष
  • स्पीड पोस्ट
  • खासदार कार्यालयामार्फत
  • अधिकृत संकेतस्थळ: pmnrf.gov.in
     
३) श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट
 
मदत मिळणारे आजार:
  • कर्करोग
  • रक्तविकार
  • GBS
  • प्रत्यारोपण
  • कॉकलियर इम्प्लांट
  • हृदय शस्त्रक्रिया
  • मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर उपचार
अटी:
  • अर्जदाराचे नाव रेशनकार्डमध्ये असणे आवश्यक
  • शस्त्रक्रियेपासून १० दिवसांच्या आत कागदपत्रे सादर करणे बंधनकारक
आवश्यक कागदपत्रे:
  • अनुदान अर्ज
  • रेशनकार्ड
  • उत्पन्न दाखला
  • आधार कार्ड
  • हमीपत्र
  • वैद्यकीय कागदपत्रे
     
४) श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास
 
मदत मिळणारे आजार:
  • हृदय शस्त्रक्रिया
  • मेंदू शस्त्रक्रिया
  • किडनी/लिव्हर प्रत्यारोपण
  • डायलिसिस
  • हिपॅटायटिस-सी
  • कॉकलियर इम्प्लांट
  • कर्करोग
  • अपघातग्रस्त रुग्ण
आवश्यक कागदपत्रे:
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • उपचार तपशील
  • रुग्णालय अंदाजपत्रक
  • उत्पन्न दाखला
  • हमीपत्र
  • रेशनकार्ड/रहिवासी पुरावा
महत्वाची माहिती:
  • आर्थिक मदत रुग्णालयाच्या नावाने धनादेशाद्वारे दिली जाते
  • प्रक्रिया कालावधी: २०–२५ दिवस
     
५) Tata Trusts
 
अर्जदार:
  • रुग्ण स्वतः किंवा जवळचे नातेवाईक
आवश्यक कागदपत्रे:
  • फोटो ओळखपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • कमावत्या सदस्यांचे उत्पन्न प्रमाणपत्र
  • पगार पावती/आयकर विवरणपत्र
  • मागील १ वर्षाचे बँक स्टेटमेंट
  • रुग्णालय अंदाजपत्रक
  • वैद्यकीय अहवाल
  • हमीपत्र
ई-मेल:[email protected]
अधिकृत संकेतस्थळ: tatatrusts.org
 
उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या महत्वाच्या सूचना
  • अर्ज स्वतः रुग्ण किंवा नातेवाईकांनीच करावा.
  • कोणत्याही मध्यस्थामार्फत अर्ज करू नये.
  • कोणालाही आर्थिक देणे-घेणे करू नये.
  • अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज नामंजूर होऊ शकतो.
गंभीर आजारांवरील महागड्या उपचारांसाठी या ५ योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहेत. योग्य पात्रता व संपूर्ण कागदपत्रांसह वेळेत अर्ज केल्यास लाखो रुपयांची मदत मिळू शकते. पात्र रुग्णांनी अधिकृत संकेतस्थळांवरून माहिती तपासून योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाचे आवाहन आहे.
 
(टीप: अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत संकेतस्थळावर अद्ययावत माहिती तपासावी.)

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.